पुष्पा का फिव्हर रुकेगा नही साला! रशियन बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'चा धुराळा...

मुंबई:  अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' या चित्रपटानं भारतात सर्वांनाचा वेड लावलं. ‘झुकेगा नही...’ हा डायलॉग सगळ्याच्या तोंडावर राज्य करत होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांन भारतात बक्कळ कमाई केली. या चित्रपटाचा ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये सामावेश आहे. या चित्रपटाने जगभरात भरपूर कमाई केली.सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जन आणि रश्मिका मंदान्ना यांनी प्रमुख भूमिका आहे. आता रशियातही पुष्पाची जादू पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पुष्पाने रशियामध्ये चांगली कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने रशियातील बॉक्स ऑफिसवर एक कोटी रूबल्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. Mythri Movie Makers ने त्यांच्या अधिकृत ट्विटर पेजवर जाहीर केले की तेलुगु ब्लॉकबस्टर 8 डिसेंबर रोजी देशभरातील 774 स्क्रीन्सवर रशियन भाषेत रिलीज करण्यात आलं.हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी भारतात रिलीज झाला आणि Muttamsetty Media च्या सहकार्याने 350 कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट बनला. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा: द राइज' ने रशियातील बॉक्स ऑफिसवर एक कोटी रूबलची कमाई केली आहे. ‘पुष्पा : द रूल’ नावाने या सिनेमाच्या सिक्वेलचे काम सध्या सुरू आहे. या दुसऱ्या भागची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने