पाकिस्तानी अर्थमंत्री अल्ला भरोसे, "अल्लाने देश बनवला तोच आता .."

पाकिस्तान: कर्जात पार बुडालेल्या पाकीस्तानला डोकं वर काढणंही कठीण झालं आहे. इथे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून ते अगदी पेट्रोल पर्यंत सर्वच गोष्टींची वानवा झाली आहे. देशाच्या भयानक दूरावस्थेची अनेक कारणे असली तरी आज पाकीस्तानी सरकारकडे लोकांचे पगार देण्याएवढेही पैसे नाहीत ही सध्य परिस्थिती आहे.जेव्हा माणसाला आपल्या हातात काही नाही असं वाटतं त्यावेळी त्याला देवाची आठवण येते हे सत्य आहे. असंच काहीसं आता पाकिस्तानी अर्थमंत्र्यांचं झालं आहे. करून सरून भागला अन देव पूजेला लागला अशी म्हण इथे लागू पडते असं म्हणायला हरकत नाही. कारण अशाच काहीशा आशयाची पोस्ट पाकिस्तानी अर्थमंत्री इशक दार यांनी इंस्टाग्रामवर टाकली आहे.त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "पाकिस्तान हा असा एकमेव देश आहे जो अल्लाच्या नावावर तयार झाला. त्यामुळे अल्लाच त्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जबाबदार आहे. आता देशाला या भयानक परिस्थितीतूनही अल्लाच बाहेर काढेल."त्यांची ही पोस्ट काही वेळातच मोठ्याप्रमाणात व्हायरल झाली आहे. आणि लोकांनी त्यांना भरपूर ट्रोलही केलं आहे. काहींनी म्हटलं आहे की, त्यांना इतिहासाचं पुस्तक द्या, पाकिस्तान ब्रिटीशांनी बनवला आहे., एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, सगळं अल्लाच करणार तर तुम्ही त्या पदावर का बसला आहात? तर एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे की, आमच्या निर्मला ताईंना घेऊन जा सर्व ठिक होईल. तर काहींना खरच पाकिस्तान आता अल्ला भरोसे आहे, असं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने