बजेटच्या तोंडावरच अर्थ मंत्रालयातला डेटा लीक; एका कर्मचाऱ्याला अटक

दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती गोपनीय माहिती इतर देशांना पुरवत होता. त्याबद्दल तो पैसेही घेत असल्याची माहिती आता समोर आली आहे.या कर्मचाऱ्याचं नाव सुमित असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला आता दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सुमित हा अर्थ मंत्रालयात कंत्राटी कर्मचारी आहे. पैशांच्या मोबदल्यात इतर देशांना गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक फोन जप्त केला आहे.



याच फोनच्या माध्यमातून तो मंत्रालयातली संवेदनशील आणि गोपनीय माहिती बाहेर देत होता. त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अर्थसंकल्पापूर्वीच ही अटक झाली आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहे.सुमितसह आणखी कोणी कर्मचारी अशा पद्धतीची कृती करत आहेत का?याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे आणखी काही कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसंच ही बाहेर पुरवली जाणारी माहिती अर्थसंकल्पाशी संबंधित आहे का, याचीही चौकशी करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने