क्रिकेटर कोहली धोनीच्या मुली ट्रोल; दिल्ली पोलिसांना कारवाईचे आदेश

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू एम.एस. धोनी आणि विराट कोहली या दोघांच्या मुलींना सध्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.वामिका कोहली आणि झिवा धोनी सिंग यांच्याविरोधात सोशल मीडियावर काही युजर्सनी अश्लील कमेंट केल्या होत्या. याप्रकरणी स्वाती मालीवाल यांनी नाराजी व्यक्त करत दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली आहे.स्वाती मालीवाल यांनी ट्विट केले. “काही अकाउंट्स ट्विटरवर देशातील दोन मोठे खेळाडू विराट कोहली आणि धोनी यांच्या मुलींचे फोटो पोस्ट करून अश्लील कमेंट करत आहेत.2 वर्षाच्या आणि 7 वर्षाच्या मुलीबद्दल अशा ओंगळ गोष्टी? तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल तर तुम्ही त्याच्या मुलीवर अत्याचार कराल का? असे संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांना नोटीस बजावत आहे.” असी माहिती दिली आहे.स्वाती मालीवाल यांनी क्रिकेटपटू विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्या मुलींबद्दल ट्विटरवर अपमानास्पद आणि असभ्य टिप्पण्या करणाऱ्यांविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून कठोर कारवाई करण्याची नोटीस दिल्ली पोलिसांना दिली आहे. असे पुन्हा कोणी करण्याची हिंमत करणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी! असही मालीवाल यांनी म्हटलं आहे.

सोशल मीडियावर महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या मुलींबद्दल अनेक अश्लिल कमेंट्स केल्या जात आहेत. त्याचवेळी दोघांच्या मुलींबाबत अश्लील फोटो पोस्ट केल्याची बाबही समोर आली आहे.या संपूर्ण प्रकरणावर आता दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना एफआयआर नोंदवण्यास सांगितले आहे.विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका 11 जानेवारीला दोन वर्षांची झाली. ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्येही, दिल्ली महिला आयोगाने वामिकाला ट्विटरवर दिलेल्या ऑनलाइन बलात्काराच्या धमक्यांची स्वत:हून दखल घेतली जेव्हा वामिका फक्त नऊ महिन्यांची होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने