शेतकऱ्याची भन्नाट आयडिया! अडीच हजार द्या, शेतात मोकळा श्वास घ्या!

थांयलंड: अतिरिक्त कमाईसाठी अनेकजण विविध कल्पना लढवत असतात. त्यात संपूर्ण जग वाढत्या वायु प्रदुषणामुळे त्रस्त आहे. ही संधी साधत एका शेतकऱ्याने कमालीची शकक्ल लढवली आहे.आज अनेकजण मोकळ्या आणि स्वच्छ हवेसाठी शहरापासून लांब मोकळ्या हवेत फिरायला जातात. त्यात कोरोना महामारीत श्वासाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कोरोना काळात अनेकांचा ऑक्सिजनच्या कमतरतेुमळे मृत्यू झाला.मोकळी आणि शुद्ध हवा प्रत्येकालाचा हवा आहे. मात्र, वेळेअभावी प्रत्येकाला शहराबाहेर जाऊन ती घेणे शक्य होत नाही. ही बाबत हेरत थांयलंडच्या शेतकऱ्याने पर्यटकांना मोकळी हवा देण्याचा विडा उचलला आहे.



वाढत्या प्रदुषणात नागरिकांना स्वच्छ हवा मिळावी यासाठी या शेतकऱ्याने त्याचं वावर खुलं केलं आहे.यासाठी हा शेतकरी तासाभरासाठी पर्यटकांकडून २५०० हजारांचे शुल्क आकारतो. तासाभराच्या या पॅकेजमध्ये हा शेतकरी पर्यटकांना त्याच्या शेतात मोफत जेवणही देत आहे.थांयलंडच्या ५२ वर्षीय शेतकऱ्याचं Hellfire Pass परिसरात शेत आहे. जे शिमला आणि मनाली सारख सुंदर असून, येथे तो भात शेती करतो. या ठिकाणी त्याने एक क्लॅम्पिंग एरियाचीदेखील निर्मिती केली आहे.

दरम्यान, देशातील सर्वात ताजी आणि शुद्ध हवा त्याच्याच शेतात असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. या कॅम्पमध्ये एक तासाच्या मुक्कामासाठी हा शेतकरी 1,000 baht म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे २५०० हजार रुपये शुल्क आकारतो.एक तासाच्या या पॅकेजमध्ये पर्यटकांना लंच किंवा डिनरचाही आनंद घेऊ शकता. एशियन लाइफ सोशल वेलफेअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे सचिव दुसित यांची ही कल्पना सध्या खूप लोकप्रिय होत आहे.दुसित त्यांच्या शेतात येणाऱ्या लहान मुलांकडून आणि दिव्यांगाकडून पैसे घेत नाहीत. एवढेच नाही तर जवळच्या शहरातून येणाऱ्या स्थानिकांकडूनही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने