पंतच्या हेल्थबाबत मोठी अपडेट; उपचारांसाठी मुंबईत हलवणार

दिल्ली:  भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी बातमी समोर आली आहे.भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.मात्र, आता पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती डीडीसीएचे संचालक शाम शर्मा यांनी दिली आहे.दरम्यान, पंतला मुंबईतील नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. 
मुंबईत पंतच्या लिगामेंट इंज्युरीवर उपचार केले जाणार आहेत. तसेच प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.अपघातात पंत मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, आगामी स्पर्धा लक्षात घेता आता दिल्ली क्रिकेट असोसीएशनने पंतवर चांगल्यातले चांगले उपचार केले जातील असे आश्वासव दिले आहे.अपघातानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय DDCA चे प्रमुख श्याम शर्मा यांच्यासह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने