या प्रश्नाचं उत्तरच नाही... गंभीर पांड्याच्या कॅप्टन्सीवर जाम भडकला

मुंबई: भारताने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर उमरान मलिकच्या ऐवजी युझवेंद्र चहलला संधी दिली. युझवेंद्र चहलने देखील कर्णधार हार्दिक पांड्याला फिन एलनची महत्वाची विकेट काढून दिली. तरी देखील भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक गौतम गंभीरने हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीवर टीका केली आहे. गौतम गंभीर म्हणाला की, मला पांड्याने सामन्यात घेतलेल्या निर्णयाने आश्चर्याचा धक्का बसला.गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, 'मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. मी या प्रश्नाचा उत्तर देऊ शकत नाही. अशा खेळपट्टीवर पांड्याने हा निर्णय घेतला. युझवेंद्र चहल हा टी 20 फॉरमॅटमधील तुमचा एक नंबरचा गोलंदाज आहे. त्याने फिन एलनची विकेट घेऊन देखील त्याला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर फक्त 2 षटके देणे, त्याचा बॉलिंग कोटा देखील पूर्ण न करू देणे या निर्णयाचे काही लॉजिक समजले नाही.'गंभीरने अर्शदीप आणि शिवम मावी सारख्या युवा खेळाडूंना संधी देण्याशी सहमती दर्शवली. मात्र युझवेंद्र चहलकडून त्याचे बॉलिंग कोटा पूर्ण करून घेणेही आवश्यक होते असे मत व्यक्त केले. न्यूझीलंडला 80 ते 85 धावात गुंडाळता आले असते. विशेष म्हणजे हार्दिक पांज्याने दीपक हुड्डाची 4 षटके पूर्ण करून घेतली.

याबाबत गंभीर म्हणाला की, 'होय तुम्ही अर्शदीप सिंग किंवा शिवम मावी यासारख्या युवा खेळाडूंना अजून एक संधी देताय मात्र तुम्ही युझवेंद्र चहलला देखील शेवटचे षटक टाकू द्यायला हवे होते. त्यामुळे हार्दिक पांड्याने इथे चूक केल्याचे मला वाटते. तो या खेळपट्टीवर न्यूझीलंडला 80 ते 85 धावात गुंडळू शकला असता. तुम्ही प्रतिस्पर्ध्याला संधी देऊ शकत नाही. हार्दिकने दीपक हुड्डाकडून 4 षटके टाकून घेतली मात्र चहलकडून नाही याचे मोठे आश्चर्य वाटत आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने