फक्त तोंडाच्या वाफा! मुंबईकर शिवा गुलवाडींनी हॉकी गोलकीपरला घेऊन दिला 3 BHK फ्लॅट

मुंबई: भारतीय महिला ज्युनिअर हॉकी संघाची गोलकिपर खुशबू खान हिच्या घराची अवस्था म्हणते पाऊस आला तर धबधबा, उन्हाळ्यात तापलेली भट्टी; जोराचा वारा आला तरी समस्या! कारण डोक्यावरचं तोडकं मोडकं छप्पर देखील उडून जाण्याची भिती. भारतीय हॉकी संघाची भक्कम भींत बनून उभ्या राहिलेली खुशबू खान स्वतः पक्क घर मात्र घेता येत नव्हतं. खुशबूने पंतप्रधान मोदींकडे पक्क्या घरासाठी आवाहन केले होते. सरकारी बाबूंनी देखील अनेक आश्वासने दिली. मात्र त्या सगळ्या निघाल्या फक्त तोंडाच्या वाफा!अखेर भोपाळच्या खुशबू खानच्या घराची दुर्दैवी कहानी मुंबई शिवा गुलवाडी यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये वाचली. शिवा खुशबूची कहाणी वाचून हादरून गेले होते. शिवा सांगतात की, 'खुशबूची स्टोरी वाचून मला जाणीव झाली की विविध देशात भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करून देखील त्यांचे कुटुंब कोणत्या वेदनेतून जात आहे. देवाच्या कृपेने आता त्यांना एका महिन्याच्या आत घर मिळणार आहे.'शिवा गुलवाडी यांनी 20 वर्षीय युवा हॉकी स्टारसाठी 36 लाख रूपयांच्या 3 BHK फ्लॅट खरेदी केला आहे. खुशबूला आता एका महिन्यात या फ्लॅटची चावी हातात मिळेल. 24 मे 2022 मध्ये टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त छापले होते. त्यानंतर शुखबूसाठी देशभरातून मदत येऊ लागली होती.खुशबू गेल्या सहा वर्षापासून भारताचे नाव विदेशात उंचावत आहे. या सर्व वर्षांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी मला पक्के घर देण्याची आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने कधी सत्यात उतरली नाहीत. घरासाठी मला एक पर्याय दिला होता. मात्र तो पर्याय रहाण्याच्या लायकीचा वाटला नाही.2017 नंतर खुशबूने बेल्जियम, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, चिली, दक्षिण आफ्रिका, बेलारूस आणि आयर्लंडमध्ये भारतीय ज्युनियर संघाचं गोलकिपर म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. याचबरोबर तिने 2021 मध्ये भारतीय ज्युनियर हॉकी वर्ल्डकपमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

खुशबूला चार भावंड आहेत. त्यांचे वडील शब्बीर खान उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो रिक्षा चालवतात. खुशबूने अजून भारतीय वरिष्ठ संघात डेब्यू केलेला नाही. 53 वर्षाच्या शब्बीर यांनी सांगितले की, माझ्या मुलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करताना पाहून आश्चर्य वाटतं. मी तिला भविष्यात देखील खेळताना पाहू इच्छितो.देशाचे प्रतिनिधित्व करताना ती विमानाने प्रवास करते, मोठ्या हॉटेल्समध्ये राहते. मात्र ज्यावेळी ती घरी येते त्यावेळी तिचे आयुष्य वेगळेच असते. ती जुन्या पडायला आलेल्या झोपडीत राहते. अधिकाऱ्यांकडे पक्क्या घरासाठी अनेकवेळा पाठवपुरावा केला मात्र पुढे काही झाले नाही. अखेर शिवा सरांनी मदत केली. माझी मुलगी एका चांगल्या घराची हक्कदार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने