गोव्यात या गोष्टी फुकटात असताना तूम्ही परदेशात कशाला जाताय?

गोवा: भारताचे सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्याचे ठिकाण म्हणजे गोवा वर्षभर स्थानिक व तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करीत असते. हिवाळ्यात सर्वत्र अल्हाददायक वातावरण असते. त्यामूळे लोक बाहेर पडून निसर्गाचा आस्वाद घेण्याचा प्लॅन करतात. त्यातही गोवा हे सर्वांचेच आवडते डेस्टीनेशन आहे. तरूणांनी तर गोवा नेहमीच हाऊसफुल असतो.नवे लग्न झालेले जोडपे असो वा मित्र मैत्रिणींचा गृप प्रत्येकाला रिलॅक्स व्हायला गोव्यालाच जायचे असते.गोवा इतर पर्यटन ठिकाणांपेक्षा महाग असला तरी तिथे तूम्हाला काही गोष्टी फुकटात करता येण्यासारख्या आहेत. त्यामूळेच आज अशा काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या तूम्हाला गोव्यात गेल्यावर अगदी फुकट मिळतील.

गोव्यातील समुद्र किनारे

उत्तरेकडील अरम्बोल बीचपासून दक्षिणेकडील कॅनाकोना बीचपर्यंत संपूर्ण दिवसभर सूर्यप्रकाशात मनसोक्त भटकंती करा आणि मग विश्रांती घेण्यासाठी समुद्रामध्ये चिंब भिजून जलक्रीडा करा. समुद्रात खेळण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे पैसे घेतले जात नाहीत.

कासवांचे घर

उत्तरेकडील मोर्जिम आणि मांड्रेम व दक्षिणेकडील अगोंडा आणि गलगीबागा हे बीच ऑलिव्ह रिडले कासवांचे नेस्टिंग ग्राउंड आहे. तिथे कासवांना त्यांच्या घरात पाहता येते.त्यांची काळजी घेता येते. तिथे विविध उपक्रमांमध्ये स्थानिक एनजीओंसोबत सहभागी होऊ शकता.
पापी चुलो हॉस्टेल

पापी चुलो हे हॉस्टेल आहे. येथे तुम्हाला पाहुणे म्हणून नव्हे तर स्वयंसेवक म्हणून राहायचे आहे. या वसतिगृहांमध्ये कर्मचारी संख्या खूपच कमी आहे.अशा परिस्थितीत तुम्ही येथे राहून त्यांच्या कामात मदत करू शकता. त्यांना अनेक कामात मदत करू शकतो. त्या बदल्यात हे हॉस्टेल तुम्हाला मोफत राहण्याची सुविधा देते.

विवा कार्निव्हल

फेब्रुवारीमध्ये वार्षिक स्वरुपात साजरा केला जाणारा विवा कार्निव्हल हा गोव्याच्या संस्कृती आणि परंपरेचा विविधरंगी उत्सव आहे. गोव्यामध्ये अवश्य करण्यासारख्या गोष्टींमध्ये याचा समावेश होतो. विविध वेशभूषेतील गायक, नर्तक व कलाकारांचा समावेश असलेल्या रंगीबेरंगी मिरवणुका असतात. हा तीन दिवसांचा उत्सव म्हणजे आनंदोत्सवच आहे.

ट्रेकींग

निसर्गाची मुक्त उधळण म्हणजे गोवा. तेच निसर्ग सौंदर्य अनूभवायचे असेल तर गोव्यात जाऊन ट्रेकींग करू शकता.दुधसागर धबधब्याच्या आजूबाजूला वसलेल्या मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाचे जंगल बघा किंवा भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यामधून कृष्णपूर घाटाकडे ट्रेकींग करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने