आधीच्या पंतप्रधानांनीही सर्वोत्तम कार्य केले, ते...; अमित शहांचं मोठं विधान

नवी दिल्ली : देशातील नरेंद्र मोदी सरकार लोकांनी त्यांना पसंत करण्यासाठी नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी निर्णय घेत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं. ते एका कार्यक्रमात बोलत होते. अमित शहा पुढं म्हणाले की, मोदी सरकार जनतेला आवडेल असे निर्णय घेत नाही. जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत. आम्ही जीएसटी आणला आणि आम्हाला माहित होते की त्याला विरोध आहे. आम्ही डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) आणला आणि त्याला विरोध झाला. काही निर्णय कठोर असले तरी ते सर्व जनतेच्या हिताचे आहेत.गृहमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाने 22 सरकारे आणि 15 पंतप्रधान पाहिले आहेत. या सर्वांनी आपल्या क्षमता आणि उपलब्ध संसाधनांच्या मदतीने देशाच्या विकासासाठी सर्वोत्तम कार्य केले आहे. विचारधारेची पर्वा न करता ज्यांनी चांगले काम केले, जनतेच्या कल्याणासाठी चांगले निर्णय घेतले, ते स्वीकारावेच लागेल, असंही शहा यांनी नमूद केलं.शहा म्हणाले की, वस्तुनिष्ठ आणि निःपक्षपाती नसलेले पत्रकार चांगली पत्रकारिता करू शकत नाहीत. कार्यकर्ता पत्रकार होऊ शकत नाही आणि त्याचप्रमाणे पत्रकार कार्यकर्ता होऊ शकत नाही. दोघेही आपापल्या क्षेत्रात चांगले होऊ शकतात. मात्र एकाच वेळी दोन्ही कामं करता येणार नाही. मात्र मागील काही दिवसांत एकाचवेळी कार्यकर्ता आणि पत्रकार होणारे लोक पाहायला मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने