ढोल-ताशे, मिरवणूक अन नादखुळा पब्लिक! साताऱ्यात किरण मानेचं कडक स्वागत!

सातारा :  बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ५ पर्यंत मजल मारणारे अभिनेते किरण माने यांनी त्यांचा जबरदस्त खेळ दाखवला. माने यांनी बिग बॉस मराठी ४ मध्ये सातारचा बच्चन अशी स्वतःची ओळख सांगितली. सातारचा बच्चन अशी ओळख असलेल्या किरण माने यांचं साताऱ्यात धुमधडाक्यात स्वागत झालंय. हार - तुरे, फुलं उधळून किरण माने यांचं वाजतगाजत स्वागत करण्यात आलं.किरण माने यांची बायको, मुलगा - मुलगी आणि संपूर्ण कुटुंबीय या आलिशान सोहळ्यात सहभागी होते. महिलांनी किरण माने यांना ओवाळलं. किरण माने यांचे मित्रमंडळी आणि साताऱ्यातील तमाम जनता या सोहळ्याला सहभागी होती. किरण माने यांनी ओपन जीप मधून हात दाखवत सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. कराल नाद तर व्हाल बाद अशा घोषणा करत आणि बॅनरबाजी करत किरण मानेंची मिरवणूक काढण्यात आली.



किरण माने बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी तडफदार खेळ करत फायनल पर्यंत मजल मारली. किरण माने टॉप ३ स्पर्धक होते. बिग बॉस मराठी ४ मध्ये किरण माने यांची विकास सावंत सोबतची मैत्री दिसली. याशिवाय राखी सावंत सोबत असलेली मानेंची केमिस्ट्री घरात आणि घराबाहेर चर्चेत राहिली.बिग बॉसमध्ये जाण्याआधी मुलगी झाली हो मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने किरण माने यांची चर्चा झालेली. याशिवाय मुलगी झाली हो मधील सहकलाकारांनी त्यांच्यावर असभ्य वर्तवणूक केल्याचा आरोप लावलेला. पुढे राजकीय पोस्ट केल्याने मला मालिकेतून काढण्यात आलं असा किरण माने यांनी चॅनल आणि मालिकेच्या टीमवर आरोप केलेला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने