सलामीसाठी गरजणार स्वदेशी इंडियन फील्ड गन; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सलामी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रिटिशकालीन २५ पाउंडर तोफा इतिहास जमा होणार आहे.यंदाच्या प्रजासत्ताक दिनापासून मेड इन इंडिया 105 मिमी इंडियन फील्ड गनने सलामी दिली जाणार आहे.यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परडमध्ये सर्व उपकरणे स्वदेशी असतील. यामध्ये आकाश वेपन सिस्टम, रुद्र आणि एएलएच ध्रुव सारखे हेलिकॉप्टर आदींचा समावेश असणार आहे, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली आहे.यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय लष्कराची सर्व उपकरणे मेड इन इंडियाची असणार आङे. यंदाच्या परेडमध्ये 21 तोफांची सलामी स्वदेशी बनावटीच्या 105 मिमी इंडियन फील्ड गनद्वारे (IFGs) दिली जाणार आहे. याशिवाय सर्व दारूगोळादेखील स्वदेशी असणार आहे.



25-पाउंडर आर्टिलरी

ब्रिटिश फील्ड गन सलामीसाठी 1940 पासून वापरले जात होते. दुसऱ्या महायुद्धात ही तोफेचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. या तोफेचे वजन 1633 किलो, लांबी 15.1 फूट आहे.यातून बाहेर पडणाऱ्या शेलची रेंज साडेबारा किलोमीटर आहे. दुस-या महायुद्धात त्याचा वापर शत्रूच्या टाक्या नष्ट करण्यासाठी केला जात असे.भारतीय लष्कराने पाकिस्तानसोबतच्या पहिल्या युद्धात म्हणजे 1947 च्या भारत-पाक युद्धात या तोफेचा वापर केला होत. यानंतर 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातही याचा वापर केला गेला होता. तसेच 1962 च्या चीनसोबतच्या युद्धातही भारताने या ब्रिटीश तोफेतून शेल डागले होते.

अशी आहे 105 मिमी भारतीय फील्ड गन

भारतीय फील्ड गनची अनेक वैशिष्ट्ये ब्रिटिश L118 लाइट गन सारखी आहेत. ही तोफ हलकी असल्यामुळे ती कुठेही नेली जाऊ शकते.सर्वात कमी वजनाची तोफ 2380 किलोची, तर सर्वात वजनदार तोफ 3450 किलो वजनाची आहे.ही तोफ दर मिनिटाला सहा दारूगोळे मारू शकते. या तोफेमध्ये उणे 27 अंश सेल्सिअस ते 60 अंश तापमानापर्यंत काम करण्याची क्षमता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने