Netflix Series चा 'हा' हिरो बनला जगातला सगळ्यात हॅंडसम पुरुष,जाणून घ्या भारतातून कोण आहे लिस्टमध्ये सामिल?

मुंबई: जगभरात सुंदर दिसणारी महिला हे जाणून घेण्यात जितका इंट्रेस्ट आपल्या सगळ्यांना असतो तितकाच इंट्रेस्ट जगात सुंदर दिसणारा पुरुष कोण हे जाणून घेण्यात नक्कीच असणार.ग्रीक गोल्डन रेशियो इक्वेशन नं जगभरातील १० देखण्या पुरुषांच्या नावाची यादी जाहीर केली आहेत. या यादीला कॉस्मेटिक सर्जन डॉ.जूलियन डि सिल्वानं तयार केलं आहे. जगातील सगळ्या हॅंडसम पुरुषांच्या यादीत पहिल्या नंबरवर आहे नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या पॉप्युलर सीरिज ब्रिजटर्न मधील लीड रोल प्ले केलेला अभिनेता.

रेगे जॉन पेज बनला जगातला सगळ्यात हॅंडसम पुरुष

ब्रिजटर्न सीरिजमधील सिमोन बसेट ही व्यक्तिरेखा साकारणारा ३४ वर्षीय अभिनेता रेगे जॉन पेज जगातला हॅंडसम पुरुष बनला आहे. ग्रीक गोल्डन रेशियो च्या निष्कर्षानुसार रेगेचा चेहरा ९३.६५ टक्के परफेक्ट आहे. यासाठी कम्प्युटराइज्ड मॅपिंग टेक्निकचा वापर केला गेला आहे. सुंदरतेचं मोजमाप करण्याचं ही एक शास्त्रीय पद्धत आहे,जी खूप जुनी आहे.क्रिस हेम्सवर्थ देखील लिस्टमध्ये सामिल आहे.

या लिस्टमध्ये क्रिस हेम्सवर्थचं नाव दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचा चेहरा ९३.५३ परफेक्ट आहे असं या रेशियोनुसार समोर आलेलं आहे. तिसऱ्या नंबरवर माइकल बी जॉर्डन सामिल आहे तर चौथ्या नंबरवर गायक हॅरी स्टाइलसचं नाव आहे.या यादीत पाचव्या नंबरवर इंग्लिश फूटबॉलर ज्यूड बेलिंघम आहे तर सहाव्या नंबरवर रॉबर्ट पेटिन्सन सामिल आहे. जगातील सगळ्यात हॅंडसम पुरुषांच्या यादीत सातव्या नंबरवर क्रिस इवांस तर आठव्या नंबरवर जॉर्ज क्लूनी, नव्या नंबरवर हेनरी गोल्डिंग आणि दहाव्या नंबरवर ड्वेन जॉन्सनचं नाव सामिल आहे.या यादीत भारतातूून कोणाची वर्णी लागली नाही त्यामुळे अर्थातच भारतातून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.जगातल्या सगळ्या हॅंडसम पुरुषांती यादी तयार करण्यासाठी कॉस्मेटिंक सर्जन डॉ.जूलियन डिसिल्वा यांनी कॉम्प्युटराइज्ड टेक्निकचा वापर केला आहे. डॉ. जूलियनच्या या टेक्निकच्या आधारावर अंबर हर्डला जगातली सगळ्यात सुंदर महिला बनण्याचा मान मिळाला होता. आता रेगे जॉन पेज जगातला सगळ्यात हॅंडसम पुरुष बनला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने