मराठी कलाकार म्हणतायत,'पटलं तर घ्या..', काय आहे भानगड?

मुंबई: सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे जिथे एकाच प्लॅटफॉर्मवर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सारेच एकत्र नांदतात. इथे प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयु्ष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. चाहते आणि सेलिब्रिटी यांच्यातील एक उत्तम धागा म्हणजे हा सोशल मीडिया. इथे सेलिब्रिटींनी एखादी पोस्ट केली की ती लागलीच व्हायरल झालीच पाहिजे. किंवा एखादा हॅशटॅग त्यांनी वापरला की तो ट्रेन्ड झालाच पाहिजे. सध्या ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर 'पटलं तर घ्या..' हा हॅशटॅग ट्रेन्ड होताना दिसतोय. अन् 'पटलं तर घ्या..' नक्की काय भानगड आहे यावरनं तर्क वितर्क लावले जात आहेत.कलाकार अनेकदा एखादा हॅशटॅग वापरतात तो त्यांच्या नव्या कलाकृतीविषयी अंदाज देणारा असतो. पण पटलं तर घ्या हा हॅशटॅग सोनालीनं वापरला आहे तो तिच्या व्हिक्टोरिया सिनेमाच्या प्रमोशनल पोस्टमध्ये...सायली संजीवनं तिच्या एका फोटो पोस्टसाठी हा हॅशटॅग वापरला आहे. ज्यात ती खरंतर साडी, डिझायनर ब्लाऊज आणि एकंदरीत लूकला प्रमोट करताना दिसतेय.तसंच, अनेक कलाकारांनी आपल्या पोस्टसोबत पटलं तर घ्या हा हॅशटॅग वापरल्यानं लोकांना काही कळेनासं झालंय. आता इतके सगळे कलाकार एकत्र पटलं तर घ्या चा हॅशटॅग वापरत असल्यानं या नावाचा सिनेमा येतोय की एखादा शो असे प्रश्न देखील लोक विचारताना दिसत आहेत.एक मात्र आहे नवीन काही तरी नक्कीच भेटीस येणार आहे. नाहीतर इतके सगळे कलाकार 'पटलं तर घ्या..' असं का बरं एकाच वेळेस प्रमोट करतील. अर्थात जे घडणार आहे ते छोटा पडदा, मोठा पडदा की ओटीटीवर..? हे चित्र देखील लवकरच स्पष्ट होईल. आणि मनोरंजनाची ती मोठी ट्रीट असणार यात शंकाच नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने