भीषण हेलिकॉप्टर अपघातात गृहमंत्र्यासहीत 16 जणांचा मृत्यू

युक्रेन: युक्रेनची राजधानी कीव येथे हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन मुले आणि युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह 16 जणांचा मृत्यू झाला.राष्ट्रीय पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको, यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षणी एकूण 16 लोक ठार झाल्याची माहिती आहे. गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांच्यासह गृह मंत्रालयाचे अनेक उच्च अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.हा भीषण अपघात रहिवासी वस्तीत झाला आहे. एका इमारतीला धडकल्याने हेलिकॉप्टर खाली कोसळले. तिथे लहान मुलांची शाळादेखील आहे. या अपघातामध्ये गृहमंत्र्यांसह 16 जणांचा मृत्यू झाला. असून दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.क्लेमेंको यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन सरकारशी संबंधित तीन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये युक्रेनचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिर्स्की, त्यांचे प्रथम उपनियुक्त येवरेन येसेनिन आणि राज्य सचिव युरी लुबकोविक यांचा समावेश आहे.कीवचे राज्यपाल ओलेक्सी कुलेबा यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी अंगणवाडीतील लहान मुलं आणि कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने