लोकसंख्या नियंत्रण कायदा न केल्यास राममंदिरही असुरक्षित तोगडिया यांचा दावा

नवी दिल्ली : देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे निमंत्रक प्रवीण तोगडिया यांनी केली आहे. लोकसंख्या नियंत्रण आणि लोकसंख्येतील असमतोलावर चिंता व्यक्त करताना तोगडिया म्हणाले की संसदेत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला नाही तर अथक प्रयत्नांनंतर बांधले जात असलेले अयोध्येतील राम मंदिरही ५० वर्षांनंतर सुरक्षित राहणार नाही.कोट्यवधी हिंदूंनी एकत्र येऊन लोकांना जागृत करण्याचे काम केले आणि राम मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन केले असे सांगून तोगडिया म्हणाले की रामजन्मभूमी आंदोलनाच्या कालावधीत हिंदूंनी गावोगावी जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवला आणि राममंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा केला.तोगडिया यांनीही वाराणसीतील ‘ज्ञानवापी‘ मशिदीच्या विषयावरही आपले मत मांडले. ते म्हणाले की, ज्ञानवापीच्या जागेवर शिवमंदिरच होते आणि ते सिद्धही झाले आहे.ज्ञानवापीमध्ये बाबा विश्वनाथ बसले असून तेथे शिवलिंगाची पूजा न करणे हे पाप असल्याचे त्यांनी सांगितले. बाबा विश्वनाथांची पूजा लवकर सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा त्यांच्या हृदयात वसलेली आहे आणि कोणाचेही विधान ही श्रद्धा कधीच संपवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. त्यामुळे हिंदू धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, लोकप्रियता मिळवण्यासाठी ते असे प्रकार करत आहेत. हिंदू समाजाने अशा लोकांकडे लक्ष देऊ नये असे ते म्हणाले.

क्षेपणास्त्रे, तलवारीही शांततेचे प्रतीक - हिंदू नेता

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बुलडोझर शांतता आणि विकासाचे प्रतीक असू शकतात' या वक्तव्याला तोगडिया यांनी पाठिंबा दर्शवला. ते म्हणाले की तलवारी आणि क्षेपणास्त्रेही शांततेचेच प्रतीके आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने