'ॲव्हेंजर्स'चा स्टार जेरेमीचा गंभीर अपघात, बर्फ हटवताना...

मुंबई:  ॲव्हेंजर्सच्या मालिकेनं जगभरातील प्रेक्षकांना वेडं केलं होतं. भारतातही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. आता या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता जेरेमी रेनरचा अपघात झाला आहे. त्याला गंभीर दुखापतही झाली आहे. त्याच्या अपघाताची बातमी व्हायरल होताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.गंभीर दुखापत झाल्यानं त्याला एअरलिफ्ट करुन एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घराबाहेरचा बर्फ हटवण्यासाठी गेलेल्या जेरमीला मोठा अपघात झाला आहे. त्याची प्रकृती अजुनही गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये जेरमीनं आपल्या प्रकृतीविषयी सांगितले होते. त्यात आता त्याचा अपघात झाल्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे.न्यु इयरच्या पूर्वसंध्येला जेरमीच्या घराबाहेर मोठा बर्फवर्षाव झाला होता. त्याचे घर नॉर्थ नेवादा याठिकाणी आहे. अशावेळी जवळपासच्या ३५ हजार घरांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. अनेकांना ब्लॅकआऊटचा सामना करावा लागला होता. अशावेळी जेरमीच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात बर्फ साचले होते. त्यात त्याचा अपघात झाला. तो गंभीर जखमी झाला आहे.जेरमीच्या एका प्रवक्तत्यानं सांगितलं आहे की, जेरमीवर उपचार सुरु आहेत. तो उपचारांना प्रतिसादही देत आहे. जेरमी हा जगभरात लोकप्रिय असणारा अभिनेता आहे. अॅव्हेंजर्सच्या सीरिजनं त्याला लोकप्रिय केले आहे. कॅप्टन अमेरिकामध्येही त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने