पाकिस्तानी लष्कराकडून अभिनेत्रींचा हनी ट्रॅपसाठी वापर; माजी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ, कोण आहे सजल अली?

मुंबई: बॉलिवूडच्या अभिनेत्री फोटोशूटमुळे किंवा पार्टीतील बोल्ड लूकमुळे चर्चेत येत असतात. तसेच सोशल मीडियासारख्या माध्यमावर आपले मत व्यक्त करतानादेखील ट्रोल होत असतात. अभिनेत्रींना गैरवर्तवणुकीलादेखील सामोरे जावे लागते. बॉलिवुडच्याच नव्हे तर पाकिस्तानातील अभिनेत्रींनबाबत फसवणूक झाली आहे.निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा यांनी नुकताच एका खुलासा केला आहे. माजिर राजा हे YouTuber देखील आहेत. त्याने आरोप केला आहे की पाकिस्तानच्या लष्कराने अभिनेत्री सजल अलीचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर केला होता. मेजर राजा ‘सोल्जर स्पीक्स’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवतात आणि त्यांचे सुमारे ३ लाख सदस्य आहेत.अभिनेत्री तिच्या आणि इतर काही अभिनेत्रींवर बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल सजल अलीने मेजर राजा यांच्यावर टीका केली आहे. सामा टीव्हीशी बोलताना तिने हे सांगितले. मेजर राजाने कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले नाही फक्त अभिनेत्रींची आद्याक्षरे वापरली. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी असा अंदाज लावला की व्हिडिओमध्ये नमूद केलेली आद्याक्षरे ही त्या अभिनेत्रींची आहेत ज्यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) निर्मित नाटकांमध्ये काम केले होते.

कोण आहे सजल अली?

सजल अलीचा जन्म १९९४चा असून ती एक एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००९ मध्ये तिने जिओ टीव्हीच्या विनोदी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर ती ‘मेहमूदाबाद की मलकैन’ नावाच्या प्रचंड लोकप्रिय कौटुंबिक नाटकात दिसली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने