'मला वेळीच योग्य उपचार मिळाले म्हणून..', हॉस्पिटलमधून 'रुस्तम' फेम इलियानाची भावूक पोस्ट

मुंबई:  अभिनेत्री इलियाना डिक्रूझनं आपले काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत जे पाहून तिचे चाहते मात्र हैराण झाले आहेत. इलियानानं फोटो शेअर करत आपल्याला बरं नसून आपण हॉस्पिटलमध्ये आहोत असं त्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. इलियानानं आपल्या हेल्थविषयी अपडेट दिली आहे,इलियानानं बॉलीवूडमध्ये अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. रणबीर कपूरसोबत 'बर्फी' सिनेमात काम करून अधिक चर्चेत आलेल्या इलियानानं अक्षय कुमारसोबत केलेल्या 'रुस्तम' सिनेमातून अनेकांची मनं जिंकली आहेत.इलियानानं इन्स्टाग्रामवर सुरुवातीला दोन फोटोंचा कोलाज शेअर केला होता आणि आपण हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर तिनं एक नवा फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिली.या फोटोत इलियाना नो-मेकअप लूकमध्ये दिसत आहे. तिच्याकडे पाहून स्पष्ट होतंय की अभिनेत्रीची तब्येत ठीक नाही. पहिल्या स्लाइडमध्ये अभिनेत्रीनं आपले दोन फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये दिसतंय की तिच्या हाताला सलायन लावलं आहे. इलियानानं लिहिलं आहे की, ''एक दिवस किती गोष्टी बदलू शकतो...'',तिनं यावेळी डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये इलियानानं आपली सेल्फी शेअर करत लिहिलं आहे की- ''जे लोक माझी तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी मला मेसेज करत आहेत...त्यांची मी आभारी आहे. चाहत्यांच्या या प्रेमानं मी भारावले आहे,स्वतःला यासाठी मी भाग्यशाली समजते. मी आता पूर्णपणे ठीक आहे. वेळेत चांगले डॉक्टर भेटले आणि योग्य उपचार मिळाले म्हणून मी यातून बाहेर पडू शकले''.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने