मोदींचा क्रूझ 'गंगा विलास'ला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या पंतप्रधानांच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी आज (शुक्रवार) जगातील सर्वात लांबीच्या क्रूझला हिरवा झेंडा दाखवला. फाइव्ह स्टार हॉटेलच्या सुविधा असलेल्या या क्रूझचं नाव गंगाविलास आहे.वाराणसीतून गंगाविलास क्रूझचा प्रवास आजपासून सुरु झालाय. वाराणसीतील  रविदास घाट येथून पुढं बिहार, बंगालच्या मार्गानं हे क्रूज बांग्लादेश, त्यानंतर आसाममधील डिब्रूगढला पोहोचेल. पंतप्रधान मोदींनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वाराणसीत याचं उद्घाटन केलं आणि 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक आंतरदेशीय जलमार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. त्याच पार्श्वभूमीवर वाचा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे..  • गंगा नदीवर क्रूझ सेवेचा शुभारंभ हा एक ऐतिहासिक क्षण आहे, जो भारतातील पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात करेल, असं पंतप्रधान म्हणाले. नद्यांमध्ये क्रूझ सेवेच्या संचालनाशी संबंधित सुविधा देशाच्या इतर भागातही विकसित केल्या जात आहेत.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गंगा आमच्यासाठी फक्त एक प्रवाह नाही. उलट ते भारताच्या तपश्चर्येचं साक्षीदार आहे. भारताची स्थिती आणि परिस्थिती कशीही असली, तरी माँ गंगेनं नेहमीच करोडो भारतीयांचं पालनपोषण केलंय.

  • एमव्ही गंगाविलास' ही क्रूझ सेवा सुरू केल्यामुळं पर्यटनाला चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. गंगेवर बांधण्यात येत असलेला राष्ट्रीय जलमार्ग संपूर्ण देशासाठी मॉडेलप्रमाणं विकसित होत आहे. हा राष्ट्रीय जलमार्ग वाहतूक, व्यापार आणि पर्यटनासाठी महत्त्वाचं माध्यम ठरणार आहे.

  • 2014 मध्ये भारतात फक्त 5 राष्ट्रीय जलमार्ग होते. आज 24 राज्यांमध्ये 111 राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याचं काम सुरू आहे. यापैकी सुमारे दोन डझन जलमार्गांवर सेवा सुरू आहेत, असंही मोदी म्हणाले.

  • 21 व्या शतकातील हे दशक भारतातील पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचं दशक आहे, असं पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. या दशकात भारतातील लोकांना आधुनिक पायाभूत सुविधांचं ते चित्र पाहायला मिळणार आहे, ज्याची कल्पना करणं कठीण होतं.

  • पंतप्रधान म्हणाले, ही क्रूझ 25 वेगवेगळ्या नद्यांमधून जाईल आणि ज्यांना भारतातील समृद्ध पाककृती अनुभवायची आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असेल. म्हणजेच, भारताचा वारसा आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम या प्रवासात पाहायला मिळणार आहे.

  • क्रूझ पर्यटनाचा हा नवीन टप्पा या क्षेत्रातील आमच्या तरुण सहकाऱ्यांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या नवीन संधी देईल. परदेशी पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहे, जे पर्यटक पूर्वी अशा अनुभवांसाठी परदेशात जात असत, तेही आता पूर्व-ईशान्य भारताकडं वळू शकतील.

  • वाराणसी ते डिब्रूगढ दरम्यान धावणारी जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूझ 'गंगाविलास' देशातील पर्यटनाचा नवा आयाम प्रस्थापित करण्यासाठी आणि भारताच्या गौरवशाली परंपरांची ओळख करून देण्यासाठी विविध मार्गांनी अद्वितीय आहे.

  • आज काशी आणि डिब्रूगढ दरम्यान जगातील सर्वात मोठी नदी जल यात्रा 'गंगा विलास' क्रूझ सुरू झाली आहे, त्यामुळं पूर्व भारतातील अनेक पर्यटन स्थळे जागतिक पर्यटन नकाशात अधिक ठळकपणे येणार आहेत.

  • विशेष म्हणजे, जवळपासच्या विविध घाटांवरून पर्यटक बोटीनं या टेंट सिटीला पोहोचतील. दरवर्षी ऑक्‍टोबर ते जून या कालावधीत टेंट सिटी कार्यान्वित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने