Ram Gopal Varma नी दारुच्या नशेत चक्क राजामौलींना दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाले,'तुमच्या विरोधात..'

मुंबई: सध्या संपूर्ण जगात एसएसएस राजामौली आणि त्यांचा सिनेमा आरआरआर चा सर्वत्र डंका आहे. सिनेमानं रिलीज झाल्या झाल्या बॉक्सऑफिसवर मोठमोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले होते. सिनेमानं आतंरराष्ट्रीय पुरस्कारांवरही आपलं नाव नोंदवलं आहे.नुकताच आरआरआरने 'नाटू नाटू' गाण्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला होता आणि आता ऑस्करच्या शर्यतीतही आरआरआर सामिल झाला आहे. राजामौलीच्या या यशावर खुश होऊन राम गोपाल वर्मांनी राजामौली यांची प्रशंसा तर केली पण मस्करी करता-करता त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देऊन गेले.रामगोपाल वर्मांनी राजामोलींना म्हटलं की त्यांनी आपल्या सुरक्षतेत अधिक वाढ करायला हवी आणि दावा केला आहे की ते अशा निर्मात्यांच्या गटाचा एक भाग आहेत,ज्यांनी चिढून राजामौलींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

राम गोपाल वर्मांच्या या ट्वीटनं सोशल मीडियावर नुसता दंगा करुन ठेवला आहे. रोमगोपाल वर्मा यांनी हे देखील सांगितलं की हे ट्वीट त्यांनी ४ ड्रिंक्स प्यायल्यानंतर केलं आहे. म्हणजेच मद्यधुंद अवस्थेत. लोक राम गोपाल वर्मा यांच्या या हरकतीनं हैराण झाले आहेत.काही दिवसांपूर्वी आरआरआर च्या ट्वीटर हॅंडलवरनं एक व्हिडीओ शेअर केला गेला होता,ज्यात हॉलीवूड दिग्दर्शक जेम्स कॅमरून एसएस राजामौली यांना बोलताना दिसत आहे की जेव्हा पण त्यांना इथे(हॉलीवूड) सिनेमा बनवावासा वाटेल तेव्हा त्यांनी कॅमरून यांना सांगावं.राम गोपाल वर्मा यांनी तो व्हिडीओ शेअर करत राजामौली यांची प्रशंसा केली आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे की,''दादासाहेब फाळकेंपासून आतापर्यंतच्या भारतीय इतिहासात कोणीच असा विचार केला नसेल की एखादा भारतीय दिग्दर्शक या अशा खास क्षणाचा साक्षीदार बनेल. दस्तुरखुद्द राजामौली यांनी देखील हा विचार केला नसेल''.आणखी एका ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे की त्यांना राजामौलींचे छोटं बोट चोखायचं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ''राजामौली तुम्ही प्रत्येक भारतीय निर्मात्याला पछाडलं आहे. मुगले-आझम बनवणाऱ्या आसिफ पासून 'शोले' सिनेमा बनवणाऱ्या रमेश सिप्पी, आदित्य चोप्रा,करण जोहर, भन्साली साऱ्यांनाच तुम्ही पछाडलं आहे,आणि म्हणून मला तुमचं छोटं बोट चोखायचं आहे''.मात्र यानंतर राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा एक हैराण करणारं ट्वीट केलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे की, ते एका अशा भारतीय निर्मात्यांच्या अशा ग्रुपचा हिस्सा आहोत,ज्यांनी राजामौलीच्या विरोधात गट बनवला आहे आणि त्यांना राजामौलींचा जीव घ्यायचा आहे. राम गोपाल वर्मा यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हे सीक्रेट मद्यधुंद अवस्थेत सांगितलं आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,''एसएस राजामौली सर कृपया तुमच्या सुरक्षेत वाढ करा कारण भारतातील निर्मात्यांचा एक गट तुमच्या जीवावर उठला आहे. मी देखील या गटाचा एक भाग आहे. मी हे सीक्रेट यासाठी शेअर करत आहे कारण मी ४ ड्रिंक घेतले आहेत''.भले राम गोपाल वर्मा यांनी हे ट्वीट मस्करीत आणि मद्यधुंद अवस्थेत केले आहे. पण यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता राजामौली राम गोपाल वर्मांच्या या ट्वीटवर कसे रिअॅक्ट होतायत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.आरआरआर च्या ऑस्कर नॉमिनेशन विषयी बोलायचं झालं तर तर यातील नाटू नाटू गाण्याला ऑस्करच्या बेस्ट ओरिजनल सॉंग कॅटेगरीत शॉर्टिस्ट करण्यात आलं होतं. ऑस्कर नॉमिनेशनची २४ जानेवारी रोजी घोषणा करण्यात आले आहेत. आरआरआर २४ मार्च २०२२ ला रिलीज करण्यात आला होता. यात राम चरण आणि ज्यु.एनटीआर यांच्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर १२०० करोडहून अधिक कमाई केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने