स्वातंत्र्यापूर्वीही केलं जायचं मतदान, एका क्लिकवर जाणून घ्या रंजक इतिहास

दिल्ली: घटनेनुसार १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. 1950 मध्ये देशाची राज्यघटना लागू झाल्यानंतर 1952 पासून निवडणुकांना सुरुवात झाली. या निवडणुकीत लोकशाही अंतर्गत सर्वांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.

मात्र तुम्हाला मतदानाचा इतिहास माहितीये काय?

दिलदार नगरमध्ये 'अल दीनदार शीमसी अॅकॅडमी अँड रिसर्च सेंटर'मधे 1904- 1945 पर्यंत वेगवेगळ्या मतदानाच्या याद्या हिंदू आणि उर्दू भाषेत आहेत. या यादीतून तुम्हाला कळेल की पूर्वीच्या काळी मतदान कसे व्हायचे ते.

1909 मध्ये निवडणूक कायदा झाल्यानंतर निवडणुका सुरू झाल्या

1909 मध्ये निवडणूक कायदा मंजूर झाल्यानंतर निवडणुका सुरू झाल्या. त्यावेळी मतदार यादीत फक्त ५० जणांचीच नावे होती. यापैकी १९ हिंदू आणि बाकीचे मुस्लिम मतदार होते. 1945 मधे सेंट्रल लेजिस्लेटीव्ह असेंबलीच्या यादीत केवळ मुस्लिम मतदाते असल्याचे दिसून येते.120 वर्षांआधीच्या मतदानाविषयी बोलायचं झाल्यास त्या काळी वेवळ 50 लोकांनाच मतदान करण्यचा हक्क होता. यामधे गावाचा प्रमुख, जमिनदार, मोठे सावकार, मोठे शेतकरी यांचा समावेश होता.
निवडणूकीसाठी केवळ चार व्यक्ती उभे राहायचे

1920 मधे डिस्ट्रीक्ट बोर्डाची निवडणूक होती. ज्यात फक्त 50 मतदाते होते.ज्यात लोकल बोर्ड आणि डिस्ट्रिक्ट बोर्डचा समावेश होता. यावेळी निवडणूकीसाठी प्रचार होत नव्हता. हातांनी लिहीलेल्या किंवा प्रिटींग प्रेसच्या जाहिराती असायच्या.

आज नॅशनल वोटर्स डे आहे. त्यानिमित्ताने मतदान करण्यासाठीच्या नेमक्या अटी काय ते जाणून घेऊया.

  • मतदान कसं केलं जातं, त्याची नेमकी प्रक्रिया कशी असते हे जाणून घ्या.

  • मतदानासाठी तुमचं वय किमान १८ वर्ष असलं पाहिजे.

  • मतदार म्हणून तुमची नोंद झाली की त्यानंतरच तुम्ही मतदान केंद्रात जाऊ शकता.

  • मतदान केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला लहान लहान गटांनी आत सोडलं जातं.

  • तुमचा नंबर आला की मतदान अधिकारी तुमचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक या कागदपत्रांच्या आधारे तुमची ओळख तपासून पाहील.

  • त्यानंतर दुसरा एक अधिकारी तुमच्या बोटावर लगेच न पुसली जाणारी शाई लावेल.

  • त्यानंतर मतदारांच्या रजिस्टरमध्ये तुम्हाला सही करावी लागेल. यानंतर दुसरे मतदान अधिकारी तुम्हाला स्वाक्षरी केलेली मतदार स्लीप देतील.

  • त्यानंतर तिसरा मतदान अधिकारी तुमची मतदार स्लीप घेऊन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच EVMच्या कंट्रोल युनिटवरील 'बॅलट' बटण दाबेल.

  • त्यानंतर तुम्ही मतदान करायला तयार असता. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने