शेट्टीला 'खतरों के खिलाडी' बनणं पडलं महागात, शूटिंग दरम्यान...

मुंबई: खतरो के खिलाडी म्हणुन ओळख असलेला चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. रोहित शेट्टी त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट वेब सीरिज इंडियन पोलिस फोर्ससाठी शूटिंग करत होता. त्याचवेळी हा अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.कार चेस सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाली आहे. . त्यानंतर प्रॉडक्शन टीमने त्याला कामिनेनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने किरकोळ शस्त्रक्रिया केली असली आणि रोहित शेट्टीला त्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला.बॉलिवुडमध्ये रोहित शेट्टी हा त्याच्या दमदार अॅक्शनसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीचा चित्रपट असाल तर तुम्हाला हमखास फाईट आणि अॅक्शन सीन पहायला मिळतील. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये हिरो हा कार, बाईक आणि हेलिकॉप्टरवर फाईट करतांना दिसतात.गाड्या एकमेकांवर आदळतात, तुटतात आणि नायक कधी त्यांच्या वर उभे राहतात तर कधी स्टंट करतात. चित्रपटाच्या लूकवरूनच आपण ओळखू शकता की हा चित्रपट रोहित शेट्टीने बनवला आहे. याशिवाय रोहित शेट्टी टीव्ही शो खतरों के खिलाडीमध्येही बरेच स्टंट करतो आणि खेळाडूंना ते करायला लावतो.रोहित शेट्टी बॉलीवूडमध्ये त्याच्या शानदार अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो. जरी 2022 हे वर्ष रोहित शेट्टीसाठी काही खास नसलं तरी 2023 मध्ये रोहित शेट्टी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज घेऊन येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने