बृजभूषण सिंह प्रकरणात IOA अध्यक्ष पी.टी. उशांची उडी; म्हणाल्या आम्ही निर्णय घेतलाय...

दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपुटूंनी मानसिक आणि लैंगिक छळाचे आरोप करत आंदोलन पुकारले आहे. विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. या आंदोलनात महिला कुस्तीपटूंसह बजरंग पुन्या आणि रवी दहिया यांच्यासारख्या पुरूष कुस्तीपटूंनी देखील बृजभूषण सिंह यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाची दखली केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी. उशा यांनी घेतली आहे. अनुराग ठाकूर यांनी कुस्ती महासंघाला 72 तासाचा अल्टिमेटम दिला होता. तर पी. टी. उशा यांनी भविष्यात अशी प्रकारची प्रकरणे हाताळण्यासाठी एका समितीची स्थापना करणार असल्याचे सांगितले.


पी. टी. उशा यांनी ट्विट केले की, 'या प्रकरणी मी कुस्तीपटूंशी चर्चा करत आहे. आमच्या सर्वांसाठी खेळाडूंचे कल्याण आणि सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही खेळाडूंना आवाहन करतो की तुम्ही पुढे या आणि तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडा.'भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उशा पुढे म्हणाल्या की, आम्ही न्या मिळावा यासाठी या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करण्याचे निश्चित केले आहे. याचबरोबर भविष्यात अशा प्रकारचे विषय हाताळण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.'

बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने तर बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करण्याचा देखील आरोप केला आहे. विनेशने याबाबतचा पुरावा आपल्याकडे असल्याचा दावा देखील केला आहे.विनेश फोगाटने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'बृजभूषण यांनी उत्तर प्रदेशच्या महिला कुस्तीपटूंची कारकिर्द खराब केली आहे. ते महाराष्ट्र आणि दक्षिणेतील राज्यांमधील कुस्तीपटूंची कारकिर्द देखील खराब करत आहेत. ते माझ्याशी दोन मिनिट देखील डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने