कर्नाटकच्या विद्यार्थ्याने लंडनमध्ये फडकावला राज्याचा झेंडा;

 लंडन : कर्नाटकाच्या एका परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने पदवीप्रदान सोहळ्यात कर्नाटकाचा झेंडा फडकावला आहे. लंडन येथील सिटी विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यातील हा प्रसंग असून सदर विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




व्हायरल होत असलेला व्हिडिओ लंडन येथील सिटी विद्यापीठातील असून पदवीप्रदान सोहळ्यात कर्नाटकाच्या एका विद्यार्थ्याने आपल्या राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा झेंडा फडकावला आहे. पदवी घेण्यासाठी जात असताना त्याने स्टेजवर झेंडा फडकावला असून हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.दरम्यान, हिंदुस्तान टाईम्स या वृत्तवाहिनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड केला असून या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर ८२ हजार युजर्सने हा व्हिडिओ लाईक केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने