प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 'खलिस्तान जिंदाबाद'चे पोस्टर्स; प्रशासनाची कारवाई

नवी दिल्ली : दिल्लीमधील काही भागात भिंतींवर 'खलिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा रंगवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यानं दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे.दिल्ली पोलिसांचे पीआरओ सुमन नलवा यांनी सांगितलं की, 'खलिस्तान जिंदाबाद', 'सार्वमत घ्या' अशा प्रकारच्या घोषणा भितींवर रंगवण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. दिल्लीच्या पश्चिम विहार भागात आज ही घटना घडली आहे. याची खबर मिळताच पोलिसांनी या घोषणा पुसून टाकल्या आहेत.काही तरुणांनी या घोषणा भिंतीवर रंगवल्या आहेत. पण हा शहराच्या सुरक्षेसंबंधीचा विषय नाही. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही यावेळी सुमन नलवा यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने