मला ऑस्कर जरी मिळाला तरी मी.. शेवटच्या क्षणी किरण माने भावूक..

मुंबई:   बिग बॉस मराठीच्या घरातील एक वादग्रस्त चेहरा म्हणजे किरण माने. किरण माने यांचे बाहेरच्या जगातील गाजलेले वाद आपल्याला परिचित आहेच, म्हणून हा चेहरा बिग बॉसच्या घरात आला आणि ही खणखणीत वाजलं. किरणच्या अनेक गोष्टी इतर सदस्यांना पटत नसल्याने त्याला सतत नॉमिनेट करण्यात आलं. किरण माने बिग बॉसच्या घरात राहतोय की नाही अशी चिन्ह निर्माण झाली पण सातरच्या या पठ्ठ्याने शेवट पर्यंत गड राखला. आणि शेवटच्या आठवड्यात प्रवेश केला. पण एरव्ही वाघासारखा भिडणारा किरण यावेळी मात्र भलताच भावूक झालेला दिसला.जवळपास ९३ दिवसांचा टप्पा पार करून किरण माने बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचला. इथपर्यंतचा त्याचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता.त्याच्यावर घरातल्या सदस्यांनी प्रचंड टीका केली. अगदी विकास आणि त्याच्या मैत्रीवरून तर रोज राडे होत होते. कधी किरण ला कपटी बोललं गेलं तर कधी स्वार्थी. एक वेळ अशी आली की विकासनेही किरणची साथ सोडली. पण ५२ वर्षांचा हा स्पर्धक दमला नाही, हताश झाला नाही की मागे वळला नाही. किंबहुना अधिक जिद्दीने खेळून शेवटच्या आठवड्यात आला आणि टॉप ६ खेळाडूंमध्ये त्याचे नाव जाहीर झाले.या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस सहाही स्पर्धकांचा आजवरचा प्रवास दाखवत आहेत.त्यांचे अभिनंदन करत आहेत.यासाठी बिग बॉसच्या घरातच एक खास सेट उभारण्यात आला आहे, जिथे तो स्पर्धक येताच रोषणाई होते, फटाके फुटतात आणि त्याचे जंगी स्वागत होते. असेच स्वागत काल किरण मानेचे झाले.

यावेळी बिग बॉसने साताऱ्याचा बच्चन अशी किरण मानेची ओळख सांगितली.या प्रसंगी किरण माने प्रचंड भावूक झाला. भाग गेला क्षीण गेला.. अवघा झाला आनंद अशा अभागांच्या ओळीतून त्याने आजवरचा त्याचा प्रवास उलगडला. शिवाय मला ऑस्कर जरी मिळाला तरी मी त्या स्टेजवरुनही हेच सांगेन की 'बिग बॉस'माझे गॉड फादर आहेत.ही म्हणताना तो प्रचंड रडला. असा किरण माने पहिल्यांदाच सर्वांनी पाहिला.पण सर्वच स्पर्धक तोडीस तोड असल्याने आता ट्रॉफी नक्की कुणाकडे जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने