नऊ वर्षाची जेटशेन डोहना लामा ठरली सारेगमप लिटिल चॅम्प्सची विजेती

मुंबई: सारेगमप लिटिल चॅम्प्स सिझन-9 चा विजेता कोण होणार याची गेली काही दिवस मनोरंजन विश्वात बरीच चर्चा होती. कारण उत्तम सादरीकरण आणि एकास एक दमदार स्पर्धक यामुळे स्पर्धा चांगलीच वरचढ झाली. काल या स्पर्धेचा महाअंतीम सोहळा पार पडला. अवघ्या देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. अखेर आपल्या सूरांची जादू करत अवघ्या नऊ वर्षांच्या जेटशेन डोहना लामा हिनं  'सारेगमप' लिटिल चॅम्प्स सिझन-9 च्या विजेते पदाचा किताब पटकावला.हा सीजन चांगलाच उत्कंठा वर्धक ठरला. गेली तीन महीने या छोट्या कलाकारांनी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं होतं. परंतु आपल्या गाण्याचा अनोखा नाडाज दाखवत हर्ष सिकंदर, रफा यासमीन, अथर्व बक्शी, अतनु मिश्रा, जेटशेन लामा आणि ज्ञानेश्वरी घाडगे ही सहा लिटिल चॅम्प्स अंतिम फेरीत दाखल झाले. आणि अखेर ही ट्रॉफी जेटशेननं पटकावली.या कार्यक्रमाचे परीक्षक शंकर महादेवन , अनु मलिक  आणि निती मोहन  यांनी केले तर कॉमेडियन भारती सिंगनं सारेगमपच्या-9 चं सूत्रसंचालन केलं. जेटशेन या कार्यक्रमाची विजेती ठरली तर हर्ष सिकंदर-  ज्ञानेश्वरी घाडगे हे पहिले आणि दुसरे रनरअप ठरले.जेटशेन डोहनाला  सारेगमप सिझन-9 हा शो जिंकल्यानंतर ट्रॉफी आणि दहा लखांचे बक्षीस मिळाले.  अभिनेते जॅकी श्रॉफ आणि चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील  सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या-9  च्या ग्रँड फिनालेला हजेरी लावली होती. 'माझं स्वप्न पूर्ण झालं. ही स्पर्धा कठीण होती. कारण या सिझनमधील स्पर्धक खूप टॅलेंडेट होते. मी सगळ्यांचे आभार मानते.' असे प्रतिक्रिया जेटशेन विजेतेपद पटकावल्यावर दिली. सोशल मीडियावर सध्या तिची प्रचंड चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने