कर्माची फळं! कर्मचाऱ्यांना काढलं अन् पब्लिकनं दाखवला इंगा; जेफ बेझोसनं गमावले 1 बिलियन डॉलर

नवी दिल्ली : जगातील बलाढ्य ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननं नुकताच आपल्या १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं होतं. जगातील एखाद्या कंपनीनं एकाचवेळी सर्वाधिक लोकांना एकाच वेळी कामावरुन काढण्याची ही पहिलीच वेळ होती. पण आपल्या या कृतीचा मोठा झटका अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांना बसला आहे. कर्मचाऱ्यांना काढण्याचं वृत्त प्रसारित होताच, अॅमेझॉनला शेअर बाजारातून मोठा झटका बसला, यामध्ये बेझोस यांना एकाच दिवसात तब्बल १ बिलियन डॉलरच नुकसान सोसावं लागलं आहे. याचा थेट फटका बेझोस यांच्या संपत्तीला बसला आहे. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या माहितीनुसार, जेफ बेझोसनं ९४९ मिलियन डॉलर ज्याची किंमत सुमारे १ बिलियन डॉलर इतकी संपत्ती एकाच दिवसात गमावली आहे. अॅमेझॉननं आपल्या १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्यानंतर लगेचच शेअर बाजारात हा परिणाम पहायला मिळाला. १०६ अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती गमवावी लागल्यानं बेझोस हे सध्या जगातील अब्जाधिशांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर ढकलले गेले आहेत. अॅमेझॉनच्या शेअर्समध्ये आणखी पडझड होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचं समर्थन करताना अॅमेझॉनचे सीईओ अँडी जेस्सी यांनी अधिकृत निवेदना काढत कबुली दिली की, सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर या वर्षी कंपनीचं रिव्ह्यू करणं अधिकच अवघड बाब बनली आहे. गेल्याकाही वर्षात आम्ही वेगवान कर्मचारी भरती केली पण आता कंपनीला विविध विभागातून कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात आहे. या कर्मचाऱ्यांचा काढण्याचा अॅमेझॉन स्टोअर्स आणि PXT अॉर्गडनायझरवर याचा मोठा परिणाम होणार आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये विविध विभागातील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं होतं. पण नेमकं किती कर्मचाऱ्यांना काढलं याचा तपशील त्यांनी दिला नव्हता. पण आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कायद्यातील फायदे आणि त्यांना इतरत्र काम मिळवून देण्यात मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने