महिंद्रा स्कॉर्पिओ जॉइन करणार इंडीयन आर्मी, एवढ्या ताकदीचं आहे इंजिन..

दिल्ली: या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. देशभरात कुठे काय घडतंय, सोशल मीडियावर काय व्हयरल होतंय याचे सगळे अपडेट्स महिंद्रा यांच्याकडे असतात. त्यावर ते सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. त्यांचं देशप्रेम तर सर्वज्ञात आहे.याच महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ एसयूवी लवकर भारतीय सेनेच्या ताफ्यात सहभागी होणार आहे. महिंद्रा अॅन्ड महिंद्राने भारतीय सेनेला स्कॉर्पिओ एसयूवीच्या 1470 गाड्यांची ऑर्डर दिली आहे. महिंद्र कंपनीने ऑफिशिअल ट्विट करत कंपनीला गाड्यांची ऑर्डर दिल्याची माहिती दिली आहे. भारतीय सेनेच्या ताफ्यात स्कॉर्पियो क्लासिक मॉडेलच्या जुन्या मॉडेलची ऑर्डर देण्यात आली आहे.सैन्याला दिलेली स्कॉर्पिओ ही या अर्थाने वेगळी आहे कारण तिच्या बाजूला ब्लॅक प्लास्टिक पॅनल दिसतय. गाडीच्या बाहेरील बाजूचं नुकसान टाळता यावं यासाठी गाडीच्या विंडशील्डच्या बाजूला उभ्या स्टॅक केलेल्या टेल लाइट्सच्या वर हे पॅनल लावले आहेत.
आर्मी स्पेशल स्कॉर्पिओ...

आर्मी स्पेशल स्कॉर्पिओच्या इंटीरियरबद्दल बोलायच झाल्यास, महिंद्रा कंपनीने ट्विट केलेल्या फोटोमध्ये, ओल्ड स्कॉर्पिओ दिसत आहे. गाडीचा लूक, अलॉय व्हीलचे जुने डिझाइन आणि महिंद्राच्या जुन्या लोगोवरून स्पष्ट होते, आर्मी स्पेक मॉडेलला 4WD तंत्रज्ञान आणि टो हिच देखील दिलेली पाहायला मिळते.आर्मी स्पेक स्कॉर्पिओमध्ये विंडशिल्डच्या वरती दोन्ही बाजूंना व्हर्टिकल टेल लाईटच्यावर प्लास्टिक पॅनल दिले आहे. आर्मी स्पेक महिंद्रा स्कॉर्पिओच्या इंटेरिअरमध्ये ग्रे आणि काळ्या रंगाचे इंटेरिअर आणि एक टचस्क्रीम इंफोटेनमेन्टसह क्लायेट कंट्रोल दिला आहे. तसेच या गाडीमध्ये अनेक सुविधा देण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

सैन्यासाठी स्कॉर्पिओ इंजिन

या स्कॉर्पिओचे इंजिन तपशील अजून उघड झाले नाहीयेत. आणि हे जुनं मॉडेल असल्यामुळे यात 140hp 2.2-लिटर इंजिन देखील वापरलं जाऊ शकतं. यासोबत सिक्स-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑप्शन देखील मिळणार आहे. दुसरीकडे, नव्या स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2 लीटर डिझेल इंजिन आहे. जे 130 HP जनरेट करते.

भारतीय सैन्याची वाहने

यापूर्वी भारतीय लष्कराने आपल्या ताफ्यात टाटा झेनॉनचा समावेश केला होता. याशिवाय टाटा सफारी स्टॉर्म आणि मारुती सुझुकी जिप्सीही भारतीय लष्करात सामील झाल्या आहेत. यापैकी जिप्सी खूप लोकप्रिय होती आणि जवळजवळ दोन दशके भारतीय सैन्याच्या तफ्याचा एक भाग होती. 2018 मध्ये, टाटा मोटर्सने आर्मी-स्पेक थ्री-डोर टाटा सफारी स्टॉर्म सादर केली होती. परंतु भारतीय सैन्यात या गाडीचा समावेश करण्यात आलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने