तूम्हीही बनाल करोडपती; झाडे लावा आणि लाखोंचा फायदा मिळवा!

मुंबई: झाडे लावा झाडे जगवा, अशी घोषणा तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. त्यात काय नवे, पण, झाडे लावा आणि लाखो रूपये कमवा, असे कोणी सांगितले तर तूमचा यावर विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. एका विशिष्ट प्रकारची झाडे लावल्याने तूम्ही लखपती होऊ शकता.तपकिरी रंगाचे लाकूड असलेली हि झाडे आहेत महोगनी जातीची. ज्याचे लाकूड आणि पाने बाजारात चांगल्या किमतीत विकली जातात. त्यांना इतकी मागणी आहे की यातून कोणीही कोट्यवधींचा नफा कमावू शकतो. तज्ञांच्या मते, हे महोगनी वृक्ष शेतकरी 12 वर्षात करोडपती होऊ शकतात.हे झाड लावण्यासाठी सुपीक जमीन, आवश्यक पाणी आणि कमी खतांमध्ये या झाडाचे चांगले पिक येते. त्याचे लाकूड लवकर खराब होत नाही. त्यामुळेच बाजारात याला मोठी मागणी आहे. या लाकडाचा वापर करून जहाजे, दागिने, प्लायवूड यासारख्या महागड्या वस्तू बनवल्या जातात.
कुठे लावावीत झाडे

या झाडाची लागवड अशा ठिकाणी करू नये जिथे वाऱ्याचा प्रवाह जोरदार असेल. उंच ठिकाणी त्याची झाडे नीट वाढू शकत नाहीत. म्हणूनच डोंगराळ प्रदेशात लागवड न करण्याचा सल्ला दिला जातो.या झाडांचा आणखी एक गुण आहे जो आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही फायदेशीर आहे.आपल्या सर्वांना माहित आहे की डासांमुळे अनेक आजार होतात आणि हे झाड डासांना दूर पळवून लावतात. होय, जिथे महोगनीची झाडे लावली जातात, तिथे डास आणि कीटक फिरकत नाहीत. हे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळेच त्याची पाने आणि बियांचा वापर डासांना दूर करण्यासाठी आणि कीटकनाशके बनवण्यासाठी केला जातो.या झाडाची लागवड केल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांना बळी पडण्यापासून वाचू शकाल. त्याची पाने आणि बियांपासून बनवलेले तेल साबण, रंग, वार्निश आणि अनेक प्रकारची औषधे बनवण्यासाठी वापरले जाते. यासोबतच त्याची साल आणि पानांचा वापर अनेक रोगांशी लढण्यासाठी केला जातो.

करोडपती व्हायला 12 वर्ष थांबावे लागेल

महोगनीची झाडे 12 वर्षांत तयार होतात, असे म्हणतात. यानंतर त्याचे लाकूड वापरले जाऊ शकते. त्याचे बियाणे एक हजार रुपये किलोपर्यंत बाजारात विकले जाते. तर, लाकूड 2000 ते 2200 रुपये प्रति घनफूट दराने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने