"मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव..." फडणवीसांनी दिली 'या' गायिकेला अस्सल दाद

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी मैथिली ठाकूर या गायिकेचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या कार्यक्रमासाठी शिंदे गटाच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती.ठाण्यामध्ये कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कला महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, प्रताप सरनाईक हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमातला एक व्हिडीओ फडणवीसांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केला आहे. यामध्ये ते गायिका मैथिली ठाकूरचं कौतुक करताना दिसत आहेत.व्हिडीओ शेअर करताना केलेल्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणतात, "काल ठाण्यातल्या कला महोत्सवामध्ये मैथिली ठाकूर आणि तिच्या भावंडांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. त्यांच्यावर खरंच सरस्वती देवीचा आशिर्वाद आहे. 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव...' कुमारी मैथिली ठाकूर या खरेतर बिहारी पण गायनातले त्यांचे मराठी उच्चार एकदम अचूक."गायिका मैथिली ठाकूर सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तिची भावगीते सतत व्हायरल होत असतात. तसंच तिच्या पोशाखावरुन, राहणीमानावरुन, तसंच गायनशैलीवरुन सोशल मीडियावर सतत चर्चा होत असते. तिच्यासोबत गाण्याच्या साथीला तिचे भाऊही असतात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात या भावंडांची विशेष चर्चा होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने