कोणालाच घाबरत नाही म्हणत माजी राष्ट्रपतींची मोठी घोषणा; 'ही' निवडणूक लढण्याचा केला निर्धार

श्रीलंका:  श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना  यांनी पुढील राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये. श्रीलंका फ्रीडम पार्टीच्या  पाठिंब्यानं ते ही निवडणूक लढवणार आहेत.सिरीसेना यांनी 2015-2019 पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं आहे. लंका एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका  सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहेत. मैत्रीपाला सिरीसेना यांनी SLFP मुख्यालयात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती म्हणाले, मी आपल्याविरुद्धच्या कोणत्याही कटाला घाबरत नाही. कोणत्याही गोष्टीपासून मी मागं हटणार नाही. मी कायदा आणि न्यायालयाचा आदर करतो. कितीही त्रास दिला तरी मी पुढील राष्ट्रपतीपदाची निवडणूक एसएलएफपीच्या पाठिंब्यावर लढणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने