चायना मांजा तर बॅन झाला पण भारतीय मांजासुद्धा साधा नाही, पहा प्रकार

मुंबई: संक्रांतीला पतंग उडण्याचीही पध्दत असते. एरवी लहानग्यांचा खेळ समजला जाणारा पतंग संक्रांतीला मात्र लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच उडवण्याची मजा वाटते. त्यामुळे संक्रांतीच्या आधी बाजारपेठेत माठ्याप्रमाणात पतंग आणि मांजा दिसतात. आणि संक्रांतीपासून सुरू झालेल्या या पतंग फिवर नंतर मांजामुळे किती जखमी झाले याची चर्चा सुरू होते. पण तुम्हाला माहिती आहे का हा मांजा कसा बनवला जातो आणि त्याचे किती प्रकार आहेत?कसा बनतो मांजा?

लहानपणी अनेकांनी घरगुती मांजा बनवला असेल. त्यात काच टाकली जाते मग मांजा पक्का होतो एवढीच काय ती ढोबळ माहिती आपल्याला असते. पण इथे तुम्ही व्हिडीओत मांजा बनवण्याची पुर्ण प्रक्रिया बघू शकतात.

  • यात शिजवलेला भात, रंग, काचेची पावडर, साबणाचा कोळ अशा अनेक गोष्टी मिक्स करून त्याची कणीक मळली जाते. हे सर्व पदार्थ अगदी नीट मिक्स करून त्याचा गोळा बनवला जातो.

  • नंतर हात मागावर दोऱ्या लावल्या जातात, तसा कच्चा धागा लांबच लांब ताठ बांधून ठेवलेले असतो. नंतर हा गोळा त्या धाग्यांवरून फिरवला जातो.

  • ते मिश्रण धाग्यांना लावून धागा पक्का बनवला जातो. हे कच्चे धागे बारीक असतात. पण त्यांना या मिश्रणासोबत एकत्र करत पक्के केले जाते.

  • नंतर हे धागे सुकू दिले जाते.

  • मग मांजाच्या रिळावर ते गुंडाळले जातात.

मांजाचे प्रकार

  • मिश्रणाचा गोळा कच्च्या धागांवरून फिरवताना किती धागे एकत्र करून मांजा बनवला जात आहे. त्यावर त्याचा पक्केपणा ठरतो.

  • यात ६ कॉर्ड, ९ कॉर्ड आणि १२ कॉर्डचा मांजा असे प्रकार आहेत.

  • ६ कॉर्ड मांजा - ६ कच्च्या धाग्यांना एकत्र करून हा बनवला जातो. साध्या पतंगाला उडवण्यासाठी हा मांजा योग्य असतो.

  • ९ कॉर्ड मांजा - यात ९ कच्चे धागे एकत्र केलेले असतात. हा मांजा तुलनेने जास्त पक्का असतो. फॅन्सी पतंगांना उडवण्यासाठी त्याचा फायदा होतो.

  • १२ कॉर्ड मांजा - यात १२ कच्चे धागे एकत्र केले जातात. हा सगळ्यात पक्का मांजा असतो. पतंग स्पर्धांमध्ये मोठमोठ्या पतंग उडवण्यासाठी याचा वापर केला जातो. पण यामुळे इतरांना इजा होण्याचा धोका अधिक असतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने