मकरसंक्रांतीला यंदा नात्यातील गोडवा झाला महाग,वर्षभरात तिळाचे दर 50 रूपयांनी वधारले

मुंबई : आपल्या जवळच्या माणसांच्या नात्यातील गोडवा कायम राहावा, याचा आग्रह सर्वच धरतात. नात्यातील गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी मकरसंक्रांत हा सण सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यंदा नात्यातील गोडवा महाग झाला आहे. कारण आहे, तिळाच्या वाढत्या भावाचे. गतवर्षी पेक्षा यंदा तिळाचे भाव ४० ते ५० रुपये किलो मागे वधारले आहेत.मंकरसंक्रातीला तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरी एकमेकांना तिळगुळ घ्या...गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. यंदा सण साजरा करण्यासाठी तीळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत.परंतु, नात्यातील गोडवा वाढविणाऱ्या या सणाला महागाईची झळ लागली आहे. गेल्या वर्षी तीळ १५० ते १६० रुपये किलो दराने मिळत होते. यंदा तिळाच्या दरात तब्बल ४० ते ५० रुपये किलो दरवाढ झाली आहे. या वार्षिक भाव वाढीसह संक्रांत सण तोंडावर आलेला असताना तिळाचा दर अजून १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याचे किराणा विक्रेते सांगतात.तीळ यंदा २०० ते २१० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्याचबरोबरच तिळासोबत लागणारा गुळही ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. तिळासाठी लागणारा हलवा ही महागला आहे.


दर वधारले तरी मागणी वाढलेलीच...

एकीकडे तिळाचे दर वाढलेले असतानाही तीळ व गुळाची खरेदी होताना दिसत आहे. संक्रांत सणानिमित्त महिलांची सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. किराणा दुकानासह खुल्या पद्धतीने रस्त्यावर बसलेल्या तीळ व गूळ विक्रेत्यांकडेही महिलांची गर्दी दिसत आहे. दर वाढलेले असले तरी तीळ व गूळ खरेदीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही.

भाववाढीला कारण..

यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत अतिवृष्टीने पीक झोडपली गेली. त्यात तीळही अपवाद नाही. त्यामुळे विदर्भासह गुजरात, मध्य प्रदेशातील तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारात आवक कमी व मागणी वाढल्यामुळे तिळाच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात मध्य प्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, ओरिसा या राज्यातून तिळाची आवक होत आहे.

असे वाढले दर (भाव किलोमध्ये) २०२२ २०२३

तीळ..................................... १६०........... १९० ते २१० रुपये

गूळ..........................................३०.............३५ ते ४० रुपये

हलवा------------------------------१२०-------- १५० रुपये

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने