घटस्फोटा नंतरही लेकासाठी मलायका-अरबाज एकत्र.. चाहते म्हणाले..

मुंबई: एकेकाळी बॉलीवूडमध्ये मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या जोडीला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत होते. मलायका आणि अरबाज यांनी 1998 मध्ये लग्न केले आणि 2017 मध्ये ते वेगळे झाले.त्यांचे वेगळे होणे सर्वांनाच मोठा धक्का होता. दोघेही आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे आणि आपापले आयुष्य जगत आहे. आता त्यांचा घटस्फोट झाला तरी एकमेकांबरोबर मैत्री कशी ठेवायची ही त्यांच्याकडून शिकावं..आताही ते आपल्या लेकासाठी एकत्र आले. त्या क्षणाचा विडिओ सध्या व्हायरल होत आहे. शिवाय चाहते त्यांचे कौतुक ही करत आहेत.मलायका अरोरा सध्या अर्जून कपूर बरोबर रिलेशनशिप मध्ये आहे. आणि दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. तरीही आज मलायका आणि एक्स पती अरबाज खान यांनी घटस्फोटानंतर एकमेकांशी कसे राहायचे याचे उत्तम उदाहरण मांडले आहे.घटस्फोट झाल्यानंतरही या दोघांचे चांगले संबंध आहेत आणि ते त्यांचा मुलगा अरबाजचे सहपालक आहेत. मलायका आणि अरबाज अनेकदा पार्ट्यांमध्ये आणि त्यांच्या मुलासोबत वेळ घालवताना दिसतात.गुरुवारी रात्री, हे कपल आपल्या मुलाला अरहानला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी आले, कारण तो यूएसमधील त्याच्या कॉलेजला निघाला होता. सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे मलायका आणि अरबाज यांनी आपापल्या कारमध्ये जाण्यापूर्वी मिठी मारली.हे पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना', 'समजूतदारपणा', 'खरं प्रेम' अशा अनेक कमेंट यांच्या व्हीडिओवर आल्या आहेत.अरबाज खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट "पटना शुक्ला"च्या शुटिंग मध्ये व्यस्त आहे तर मलायका अरोरा 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये व्यस्त आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने