…म्हणून शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक म्हणतात!

मुंबई:  शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.शहाजीराज्यांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले. त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते. आज शहाजी महाराजांची पुण्यतिथी.आजच्याच दिवशी १९६४ मध्ये महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असताना त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला आणि घोडा कोसळला. या अपघातात महाराजांचा मृत्यू झाला.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्याचे खरे संकल्पक शहाजी राजे भोसले होते असे म्हटले जाते. ते का याबद्दल एक खास गोष्ट जाणून घेऊयात.सिंदखेड येथील मालोजी भोसले आणि दीपाबाई (उमाबाई) या दाम्पत्याच्या पोटी शहाजी महाराजांचा यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्रींनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्याआधी शहाजी राजेंनी एका किल्ल्यावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तो किल्ला म्हणजे पेमगिरी होय.पेमगिरी किल्ल्याला भिमगड उर्फ शहागड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात हा किल्ला आहे. शहाजी राजांचा हा प्रयत्न जरी अयशस्वी ठरला असला तरी येऊ घातलेल्या हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली गेली.या गडाला शहागड असे नाव पडले तर बखरीमध्ये पेमगिरीचा उल्लेख भीमगड या नावाने येतो पण पेमगिरी किल्ला इतिहासात प्रसिद्ध झाला तो शहाजीराजांच्या पराक्रमामुळेच ओळखला जातो. संगमनेर अकोले रस्त्यावर कळस नावाचं गाव आहे. या गावातून डावीकडे जाणारा रस्ता थेट १० कि.मी.वरील पेमगिरी गावात जातो.शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले. रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. तेव्हा अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले. शहाजीराजांचे नाव सर्वत्र दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले.निजामशाही वजीर फतेह खान, जहान खानने निजामाला मारले. शहाजीराजांना निजामशाहीसाठी मिळवले.शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषाना ठार केले. तेव्हा शहाजीराजांनी निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून राज्याचा कारभार हाती घेतला. आणि एकहाती महाराष्ट्राचा कारभार चालवला.ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यांनी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.

दिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले तेव्हा घाबरून आदिलशहा, शहाजहानला मिळाला.दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी शहाजीराजांनी शहाजहानशी तह केला. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली.फेब्रुवारी 1637 मध्ये शहाजीराजे हे जिजाऊ, मुलगा संभाजी व बाल शिवाजींसह विजापूरला गेले. येथे या सर्वांना शहाजीराजे यांनी स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला.येथूनच शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजत गेले. शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायांनी मातोश्री जिजाबाई यांच्यासह पुण्यात राहून महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करावी, असे शहाजीराजे यांनी सांगितले. त्यांचा आदेश खाली न पडू देता छत्रपतींनी स्वराज्य उभारलं आणि ते योग्यरित्या चालवलेही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने