बिग बॉस मधले दुश्मन आता एकाच सिनेमात दिसणार

मुंबई: बिग बॉस मराठी ४ दोन आठवड्यांपूर्वी संपलं. बिग बॉसच्या घरात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात भांडण झाली. पण जेव्हा शो शेवटाला आला तेव्हा दोघांमध्ये चांगली मैत्रीही बघितली. दोघांनी एकमेकांना कायम सपोर्ट केला. आता किरण माने - अपूर्वा नेमळेकर दोघे एकाच प्रोजेक्ट मध्ये एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे अपूर्वा - किरणच्या फॅन्सना आनंद झालाय.किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर हे दोघे 'रावरंभा' या ऐतिहासिक सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमाचं पोस्टर काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालं. अभिनेता अशोक समर्थ या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. याच ऐतिहासिक सिनेमात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर एकत्र दिसणार आहेत. सकाळशी बोलताना अपूर्वाने तिच्या या सिनेमाचा खुलासा केलेला.

रावरंभा सिनेमात अपूर्वा पहिल्यांदाच मुस्लिम भूमिका साकारत आहे. याच सिनेमात सातारचा बच्चन अशी ओळख असलेले किरण माने सुद्धा झळकणार आहेत. किरण माने कोणत्या भूमिकेत सिनेमात दिसणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पण या सिनेमाच्या निमिताने किरण - अपूर्वा पहिल्यांदाच सिनेमात झळकणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठी ४ नंतर किरण - अपूर्वाला एकत्र पाहायला त्यांचे फॅन्स उत्सुक आहेत.


बिग बॉस मराठी ४ मध्ये किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांनी दमदार खेळ दाखवत टॉप ५ पर्यंत मजल मारली. अपूर्वा बिग बॉस मराठी ४ ची उपविजेता ठरली. तर किरण माने यांना टॉप ३ म्हणून समाधान मानावे लागले. बिग बॉस मुळे दोघांच्या फॅन फॉलोइंग मध्ये प्रचंड वाढ झाली. किरण माने यांची साताऱ्यात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तर दादरकरांच्या हृदयावर अपूर्वाने नाव कोरलेबिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा आणि किरण दोघांचे सुरुवातीला एकमेकांशी वाद झाले. पण नंतर मात्र एकमेकांसोबत दोघे कायम उभे राहिले. बिग बॉस संपल्यावर सुद्धा दोघे मित्र म्हणून चांगले आहेत. आता रावरंभा निमित्ताने अपूर्वा - किरणची जोडी मोठ्या पडद्यावर कशी जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ७ एप्रिल २०२३ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने