बृजभूषण यांच्यावरील लैंगिक अत्याचारावरील आरोपाचा चेंडू मेरी कोमच्या कोर्टात

मुंबई: लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.दरम्यान, खेळाडूंच्या आंदोलनानंतर आणि गंभीर आरोपांनंतर केंद्राकडून कुस्ती संघटनेचे कामकाज पाहण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी ऑलिम्पियन आणि माजी विश्वविजेती बॉक्सर खेळाडू मेरी कोमवर देण्यात आली आहे.
या समितीच्या सदस्यांमध्ये ऑलिम्पियन कुस्तीपटू योगेश्वर दत्त, द्रोणाचार्य पुरस्कार विजेती तृप्ती मुरुगंडे, कॅप्टन राजगोपालन, राधा श्रीमन यांचा समावेश असणार आहे. केंद्राकडून स्थापित करण्यात आलेली ही समिती कुस्ती संघटनेचे काम पाहणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने