आऊटलूक, टीम्ससह अनेक सेवा बंद पडल्यानं युजर्स वैतागले

अमेरिका : मायक्रोसॉफ्ट या टेक कंपनीच्या सेवा अचानक बंद पडल्यानं युजर्स वैतागले आहेत. यामध्ये आऊटलूक, गिटहब, टीम्स, अझुरे, लिंक्डइन अशा विविध सेवांचा समावेश आहे. या सेवा वापरता येत नसल्यानं नक्की काय प्रकार घडला आहे, हे युजर्सना कळत नसल्यानं ट्विटिरवर यासंबंधी प्रश्न विचारले जात आहेत. मायक्रोसॉफ्टचा ई-मेल प्लॅटफॉर्म असलेल्या आऊटलूकची सेवा भारतासह इतर काही देशांमध्ये बंद असल्याचं ट्विटरवरील अनेक तक्रारींवरुन सांगितलं जात आहे. या सेवा बंद झाल्यामागे सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याचं कारणही सांगितलं जात आहे. पण कंपनीकडून अद्याप यावर कुठलंही स्पष्टीकरण न आल्यानं युजर्सना मात्र काही कळेनासं झालं आहे. त्यामुळं अनेक युजर्सनं थेट मायक्रोसॉफ्टकडं याबाबत तक्रारी केल्या आहेत. काही युजर्सना मायक्रोसॉफ्टचं व्हिडिओ कॉलिंग अॅप देखील चालत नाहीए.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने