चर्चा रंगली! 'शिवसोबत वीणाच्या नात्यावर आई म्हणाली, "माझा मुलगा"

मुंबई:  मराठमोळा शिव ठाकरे हा सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आहे. शिव बिगबॉस 16 चं पर्व गाजवत आहे आणि या सिझनच्या विजेतेपदाचा तगडा दावेदारही आहे. शिवने आपल्या खेळाने सगळ्यांची मनं जिंकून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.तो या पर्वात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. त्यातचं रिलेशनशिप स्टेटसमुळे देखील अनेकदा प्रसिद्धी झोतात आला आहे.तो अनेकदा शो मध्ये त्याची मैत्रीण वीणा जगतापबद्दल बोलतांनाही दिसला.वीणा जगताप आणि शिव ठाकरे  म्हणजे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील लोकप्रिय जोडी होती. त्याच्यात प्रेमाचं नातं फुललं मात्र त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. शिवाय त्यांचे ब्रेक अप झाल्याचीही कबुली दिली होती.मात्र एका एपिसोडमध्ये त्याने तिचं नावं घेतलं आणि त्यावर विणानेही त्याला पाठिंबा दिला. त्यामुळे दोघांमध्ये अजूनही नातं असल्याची चर्चा रंगली. त्यातच आता पहिल्यांदा शिवची आई त्याच्या नात्यावर बोलली आहे.

विणाने शिवसाठी सोशल मिडियावर केलेली पोस्ट ही शिव ठाकरेच्या आईला आवडलं नसल्याची चर्चा पिंकव्हिलाशी बोलताना दोघांच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.शिवच्या हातावरील वीणाच्या नावाच्या टॅटूवर बोलताना त्या म्हणाल्या की, ‘शिव स्वतः समजूतदार आहे, आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यात अतिशय सक्षम आहे. त्याने काय करावे आणि काय नाही ते तो स्वतः ठरवू शकतो.’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने