IT चा सहा आकडी पगार 'ऐटीत' सोडला, साधू झालो! गौर गोपाल यांचं कारण ऐकून तुम्ही काय म्हणाल?

दिल्ली: आपल्याकडे प्रेरणादायी वक्त्यांची काही कमी नाही. मात्र त्यातील फार थोड्या वक्त्यांना तरुणांची पसंती मिळते. यु कॅन विनचे प्रणेते शिव खेरा असो, किंवा संदीप माहेश्वरी यांचा मोठा चाहतावर्ग आहे. सद्गगुरु यांना देखील फॉलो करणाऱ्यांची संख्या कमी नाही.यासगळ्यात सध्याच्या घडीला गौर गोपाल दास यांची नेहमीच चर्चा होत असते. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्या चाहत्यांची, श्रोत्यांची संख्या प्रचंड आहे. इंस्टावर त्यांच्या रिल्सवर पडणारा लाईक्सचा वर्षाव हा अनेकांना परिचित आहे. गोपाल दास हे कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी जी त्यांची स्टोरी सांगितली त्याची चर्चा होतेय.यापूर्वी देखील गोपाल दास यांनी आपल्या लाईफ जर्नीविषयी चाहत्यांना सांगितले आहे. मात्र कपिलच्या शोमध्ये आलेल्या गोपाल दास यांना कपिलनं जे प्रश्न विचारले ते भन्नाट होते. वेळप्रसंगी कपिलला निरुत्तर करत त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कपिलनं त्यांना तुम्ही तर आय़टी क्षेत्रामध्ये होता तर मग तो जॉब सोडून प्रवचनं का सुरु केली असा प्रश्न विचारला.कपिलच्या प्रश्नावर उत्तर देताना गोपाल दास म्हणाले, मी तर एमएनसीमध्ये खूप पैसा कमवत होतो. मला सहा आकडी पगारही होता. पण माझं त्या नोकरीमध्ये मन रमलं नाही. जे नाही ते विचार मनात येत होते. आपण एवढा पैसा कमवतो पण हातात वेळ कुठं आहे, मी माझ्या लोकांना कुठं वेळ देतो आहे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी पैसा कुणासाठी कमवतो आहे...

मी प्रेरणादायी वक्ता झालो याची वेगळीच गोष्ट आहे. मला पैसा मिळत होता पण आनंद नव्हता. माझ्या आयुष्यातील सगळा वेळ हा कंपनीसाठी जात होता. बाकीच्या गोष्टींसाठी वेळ होता कुठे, मी धोका पत्करला आणि त्या कंपनीतू बाहेर पडलो. किनाऱ्यावर पडून राहण्यात मला स्वारस्य नाही. समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवं आयुष्य जगावं असे नेहमी वाटत आले.मला वाटायचं मी लोकांना खूप काही चांगलं सांगायचो, त्यांच्याशी संवाद साधायचो. त्यामुळे मी नंतर करिअरला रामराम करण्याचा निर्णय घेतला. आणि प्रवचनाच्या वेगळ्या वाटेनं प्रवास सुरु झाला. आताचे जे काम आहे तिथं खूप स्वातंत्र्य आहे. ते मला आवडते. अशा शब्दांत गोपाल दास यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने