पहिलाच व्हिडिओ इतका भारी मग चित्रपट तर.. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाची झलक बघाच!

मुंबई: अवघ्या 95 दिवसांवर येऊन ठेपलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित आणि शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटा बाबत प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी येणार याकडे सगळे डोळे लावून बसलेले असतानाच केदार शिंदे यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा आणि काही दृश्यांचा एक व्हिडिओ शेयर केला आहे.हा व्हिडिओ मध्ये 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची झलक दिसून आली आहे. या व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून जर झलक अशी असेल तर तर चित्रपट किती दर्जेदार असेल याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.



दिग्दर्शक केदार शिंदे सध्या बरेच चर्चेत आहेत. कारण 'बाईपण देगा देवा' आणि 'महाराष्ट्र शाहीर' असे त्यांचे लोक दमदार चित्रपट लककरच प्रदर्शित होणार आहेत. त्यातही गेली काही दिवस केदार शिंदे 'महाराष्ट्र शाहीर'च्या निमित्ताने शाहीर साबळे यांच्या आठवणी शेयर करत आहेत. आज तर त्यांनी या चित्रपटातील चित्रीकरणाची एक झळक शेयर केली आहे.या व्हिडिओमध्ये शाहीर साबळे यांच्या बालरूपातील झलक समोर आली आहे. शाहीर साबळे यांची जडणघडण कशी झाले, संगीतांचे संस्कार कसे झाले हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओतील गांव आपलं लक्ष वेधून घेतो. आणि सोबतच केदार शिंदे यांनी दिलेलं कॅप्शनही..केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की, 'कलेचं बाळकडू लहानग्या कृष्णाला घरातूनच मिळालं होतं..वडील भजन गात असल्याने अगदी लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या संगीताच्या संस्कारातून त्यांच्यातला कलावंत घडत होता.. अर्थात, हा प्रवास संघर्षमयच होता..

''पण, प्रवासात आलेले खाचखळगे पार करून ठरवलेलं ध्येय गाठायचंच हा निर्धार मनाशी पक्का केल्यामुळे महाराष्ट्राला शाहिरांसारखा थोर लोककलावंत लाभला.. शाहीर साबळेंचं बालपण पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकांसोबत बालकलाकारही अगदी जीव ओतून काम करत आहेत..'''' शाहिरांवर बालपणी झालेले संस्कार, आणि त्यातून त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीचा पाया कसा रचला गेला हे सगळं २८ एप्रिलपासून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे..'' असे त्यांनी म्हंटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने