नवरा - बायकोचे सिनेमे एकमेकांसमोर धडकणार, कोण घेणार माघार ?

मुंबई: आलीय भट आणि रणबीर कपूर यांना काहीच महिन्यांपूर्वी गोंडस मुलगी झाली. दोघा नवरा बायकोची सोशल मीडियावर चर्चा असते. पण लवकरच नवरा बायकोचे सिनेमे कॅल्श होणार आहेत. त्यामुळे आलीया - रणबीरच्या सिनेमांची टक्कर होणार आहे. आलिया हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा रिलीजच्या मार्गावर आहे.आलिया भट्टने तिचा हॉलिवूड डेब्यू सिनेमा 'हार्ट ऑफ स्टोन' मधील काही नवीन फुटेज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या सिनेमात अभिनेत्री गल गॅडोट आणि अभिनेता जेमी डोरन हे हॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ११ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्स वर रिलिज होणार आहे. तर दुसरीकडे रणबीरचा 'अ‍ॅनिमल' सिनेमा सुद्धा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.खास गोष्ट म्हणजे 11 ऑगस्टलाच आलियाचा पती रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाची सध्याची रिलीज डेट आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा असलेला सिनेमा ११ ऑगस्टला जगभरातील थिएटरमध्ये होणार आहे. हा सिनेमा हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.रणबीरचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा बाप -मुलाच्या कथेभोवती फिरणारा आहे. एक मुलगा त्याच्या वडिलांसाठी काय करतो अशी हटके कथा या सिनेमाची आहे.सिनेमाच्या कलाकारांमध्ये रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. 'ब्रम्हास्त्र' नंतर रणबीरच्या या 'अ‍ॅनिमल' सिनेमाची सर्वाना उत्सुकता आहे. अशाप्रकारे आलिया आणि रणबीरच्या सिनेमाची अशी काटे कि टक्कर रंगणार आहे. त्यामुळे कोणता सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरणार हे ११ ऑगस्टलाच कळेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने