“पठाण सगळेच बघणार मात्र मी…” शाहरुखच्या ‘पठाण’वर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया

मुंबई: पठाणबद्दल सध्या बरीच चर्चा आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करूनही या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. रिलीजपूर्वीच पठाणने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 50 कोटी कमावले आहेत, त्यापैकी पहिल्या दिवशी 23 कोटी, दुसऱ्या दिवशी 13.3 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 13.9 कोटी कमावले आहेत. पठाण चा ठिकठिकाणी आज पहिला शो सुरु झालाय.. हाऊसफुल गर्दीत शाहरुखच्या पठाण ला प्रेक्षकांनी गर्दी केलीय.पठाण चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. तसेच पठाण या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकींमध्येच दमदार कमाई केली आहे. अनेक ठिकाणी पठाणचे हाऊसफुल्ल शोज सुरु आहेत. अशातच दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी पठाण आणि शाहरुख खानवर भाष्य केलं आहे.बॉलिवुडविषयी दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच भाष्य करताना दिसून येतात. अनुराग कश्यप हे सकाळीच चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अनुराग कश्यप असं म्हणाले,"शाहरुख खानला चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर बघणार आहे.
मी जास्त अपेक्षा ठेऊन जाणार नाही कारण मी शाहरुखचा चाहता म्हणून चित्रपट बघणार आहे". शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता त्यावर अनुराग म्हणाले," पठाण हा चित्रपट सगळेच जण बघणार ज्यांना वाद निर्माण करायचा आहे त्यांना करू दे". अशी प्रतिक्रिया अनुराग कश्यप यांनी दिली.शाहरुखचा पठाण रिलीजच्या पहिल्याच दिवशी पाहावा यावा यासाठी ८ लाखांपेक्षा जास्त तिकिटे बुक करण्यात आली आहेत. तसेच याबाबतीत पठाणने बाहुबली २ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. तसेच बाहुबली २’ची ६ लाख ५० हजार तिकिटे बुक करण्यात आली होती.या तुलनेत ‘पठाण’ हा चित्रपट पुढे आहे.पठाण सिनेमात शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत असणार आहेत. याशिवाय डिंपल कपाडिया, आशुतोष राणा आणि गौतम रोडे देखील आहेत. पठाण मध्ये सलमान खान एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा २५ जानेवारीला रिलीजसाठी सज्ज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने