दावोसहून परतताच CM शिंदे पंतप्रधानांच्या दिमतीला; शिंदे गटाची तातडीची बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधून येताच थेट मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेणार आहेत. यानिमित्ताने शिंदे गटाचे पदाधिकारी, आमदार यांची महत्त्वाची बैठकही होणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे दावोसहून परतताच शिंदे गटातल्या मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्य़े मोदींच्या दौऱ्याच्या नियोजनावर चर्चा होणार आहे. तसंच सभेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांना आणण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि सभेच्या ठिकाणी नागरिक वेळेत पोहोचतील, याची काळजी घेण्याबाबत शिंदे गटातल्या आमदारांना सूचना दिल्या जाणार आहे. आपापल्या मतदारसंघात असलेले आमदार या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावणार आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे दावोसहून मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर लगेचच ही बैठक होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने