'नाटू नाटू' गाणे घडवणारे एम एम किरावानी आहेत तरी कोण? वाचा सविस्तर..

मुंबई : गेल्या वर्षभराय RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू'  या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. आणि आता तर या गाण्याला 'गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023' प्राप्त झाला आहे. या गाण्याने 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा किताब जिंकला. या गाण्यातील कलाकार, डान्स लोकांच्या लक्षात आहेच पण आता चर्चा सुरू आहे ती या गाण्याचे संगीतकार एम एम किरावानी यांची.. तर जाणून घेऊया कोण आहेत एम एम किरावानी.. 



एम एम कीरावानी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्याचे पूर्ण नाव कोडुरी मारकथमणी कीरावनी आहे. आंध्र प्रदेशातील या संगीत दिग्दर्शकाला जग आता एमएम कीरावानी या नावाने ओळखते. एमएम कीरावानी यांनी तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये एक संगीत दिग्दर्शक काम केले आहे. १९९८ मधील 'जख्म' चित्रपटातील त्यांनी संगीत दिलेलं 'गलीमे आज चांद निकला' हे गाणं आजही लोक विसरलेले नाहीत.

इतकेच नव्हेतर क्रिमीनल चित्रपटातील 'तुम मिले दिल खिले' ज्या गाण्यावरून घेण्यात आले ते तेलगु 'तेलुसा मनसा' हे गाणे देखील किरावानी यांनीच संगीतबद्ध केले होते. 1989 पासून आजतागायत एमएम कीरावानी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.इतकेच नव्हेतर 'आरआरआर'पूर्वी संगीत दिग्दर्शक म्हणून एमएम कीरावानी यांनी 'बाहुबली 2' चित्रपटात आपल्या संगीताने सर्वांची मने जिंकली आहेत. आणि आता आरआरआरचे 'नाटू नाटू' गाणे जगभर प्रसिद्ध होण्यामागे एमएम कीरावानी यांचा मोठा सहभाग आहे या गाण्याने त्यांच्या नावाला चार चांद लावले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने