नामांतर वादात आता ब्राह्मण महासंघाची उडी; दवे-मिटकरी आमने-सामने

पुणे: पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.संभाजी ब्रिगेड नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ही मागणी केली आहे. या नामांतराच्या वादात आता ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे.दवेंनी मिटकरी यांच्या नामांतराच्या मागणीला विरोध करत, पुण्याच्या नामांतराची गरज नसल्याचे म्हटले आहे. जिजाऊंच भव्य आणि वेगळं स्मारक उभारा. ते लाल महाल येथे उभारा असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

दवेंच्या या मागणीनंतर पुण्याच्या नामांतराला वेगळं वळण लागण्याची चर्चा सुरू झाली असून, या वादात आता दवे आणि मिटकरी आमने सामने आले आहेत.दवे म्हणाले की, पुण्याचे नाव जिजाऊ नगर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. राजमाता या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचे आणि त्यांचे नाते सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळे पडले आहे. ते बदलण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.मिटकरी काय म्हणाले

पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर करावे. येणाऱ्या अधिवेशनात पुण्याच्या नामांतराची मागणी करणार असल्याची माहिती मिटकरी यांनी दिली आहे. यासंर्भात मिटकरी यांनी ट्विट केले आहे. 'पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.' असे मिटकरी यांनी म्हटले आहे.पुणे विद्यापिठाला ’सावित्रीबाई फुले’ असे नाव देण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पुणे शहराचे ’जिजाऊनगर’ किंवा ’जिजापूर पुणे’ असे नामांतर करावे. हे मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. असही पासलकर म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने