'आई' झाली 'आजी'.. अरुंधतीने ठेवलंय नातीचं हे युनिक नाव

मुंबई: आई कुठे काय करते मालिकेत अभि - अनघाच्या मुलीचं आज बारसं होणार आहे. अभि - अनघाच्या छकुलीचं देशमुख कुटुंबाच्या उपस्थितीत नामकरण विधी झाला. अभिषेक नावाची पाटी घेऊन बाहेर येतो. ती पाटी बाजूला करतो आणि त्यात छकुलीचं नाव लपलं असतं. छकुलीचं नाव बघून सर्वांना आनंद होतो. काय आहे छकुलीचं नाव? याची उत्सुकता सर्वांना आहे.अभि - अनघाच्या मुलीचं नाव ठेवलंय जानकी. त्यामुळे छकुलीचं नामकरण जानकी झालंय. जानकी हे नाव सर्वांना आवडलंय. सध्या अभि घरच्यांवर नाराज आहे. त्यामुळे त्याच्या मुलीचं नाव जानकी त्याला आवडलं आहे का? कि अभि नाव न आवडल्यामुळे भांडण उकरून काढणार हे आजच्या २८ जानेवारीच्या भागात पाहायला मिळेल. अभि - अनघाच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यात आशुतोष केळकर सुद्धा उपस्थित आहे. आशुतोष बारश्याला येणं अनिरुद्धला तितकं आवडलेलं दिसत नाहीये.छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता आशुतोष आणि अरुंधतीची प्रेमकहाणीही पुढे सरकत आहे. आशुतोष आणि अरुंधती यांनी एकमेकांवर प्रेम मान्य केलं आहे. आशुतोषने अरुंधतीजवळ लग्नाची मागणी घातली. अरुंधतीने सुद्धा आशुतोषच्या मागणीचा स्वीकार केला. आणि तिनेही आशुतोषला लग्नाला होकार दिला.अनिरुद्धला याची कुणकुण लागली आहे. त्यामुळे जेव्हा अनिरुद्धला या गोष्टीची खात्री होईल तेव्हा तो अरुंधतीसमोर नक्कीच भांडण उकरून काढेल. अनिरुद्ध काही शांत बसणार नाही. अरुंधतीचं लग्न होऊ न देण्यासाठी अनिरुद्ध कोणत्याही थराला जायला तयार आहे. त्यामुळे एकीकडे नातीचं बारसं झालं असलं तरी आत मालिकेत अरुंधती - आशुतोषच्या लग्नाही गडबड होणार आहे. आता मालिकेत कोणतं रंजक वळण येणार हे पाहायचं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने