लोकप्रिय संगीतकार नंदू घाणेकर अनंतात विलीन

 मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध संगीतकार नंदू घाणेकर यांचं निधन झालंय. ‘ताऱ्यांचे बेट’, ‘शाली’’, ‘सुनंदा’, ‘नशीबवान’ अशा सिनेमांना त्यांनी संगीत दिले होते. याशिवाय काही संगीत अल्बमची निर्मितीही केली होती. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलुंड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नंदू घाणेकर यांच्या पार्थिवावर बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचे बंधू नंदू घाणेकर यांनी गेली अनेक वर्षे संगीत दिग्दर्शन केले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला होते.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने